Saturday, January 11, 2025

Latest Posts

विरोधी पक्षालाही ही हत्या का झाली याचे कारण माहीत आहे

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गोळीबार प्रकरणावर प्रतिक्रिया

| TOR News Network | Devendra Fadnavis On Dahisar Firing : “अभिषेक घोसाळकर यांच्याबाबत घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेला काही लोक राजकीय रंग देत आहेत, ते योग्य नाही. घटना गंभीर असली तरी अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस यांचे एकत्रित बॅनर काही दिवसांपूर्वीच पाहायला मिळाले आहेत. वर्षानुवर्ष ते दोघे एकत्र काम करत होते. पण अचानक त्यांच्यात इतका बेबनाव का झाला? मॉरिसने अभिषेक घोसाळकरला गोळ्या का घातल्या? आणि त्यानंतर स्वतःवरही गोळीबार केला. याची चौकशी चालली आहे. अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्या योग्यवेळी उघड करण्यात येतील”, अशी भूमिका उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे. (Devendra Fadnavis Press On Abhishek Ghosalkar Firing)

परवाना नसताना ती बंदूक आली कुठून

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “माझी एवढीच अपेक्षा आहे की, ही घटना गंभीर असून याचे राजकारण करणे योग्य नाही. या घटनेवरून राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे चुकीचे आहे. पूर्ववैमनस्यातून घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर आता सदर बंदुकीचा परवाना घेतला होता का? परवाना नसताना ती बंदूक आली कुठून? तसेच इतरवेळी परवाना देताना कोणती काळजी घेतली पाहीजे, याचा आढावा घेतला जाईल.

महाराष्ट्र सरकारची अभिनव योजना मागेल त्याला बुलेट प्रूफ जॅकेट

राजीनामा मागितला याचे आश्चर्य वाटत नाही

विरोधकांनी राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, विरोधकांनी राजीनाम्याची केलेली मागणी राजकीय आहे. विरोधी पक्षाची स्थिती अशी आहे की, एखाद्या गाडीखाली श्वान आला तरी ते गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील. त्यातही घटना गंभीर आहेच. त्यामुळे राजीनामा मागितला म्हणून मला आश्चर्य वाटत नाही. विरोधी पक्षालाही ही हत्या का झाली? याचे कारण माहीत आहे.

Latest Posts

Don't Miss