Saturday, January 11, 2025

Latest Posts

देवेंद्र फडणवीस मी माझ्या अटकेची वाट पाहत आहे – अनिल देशमुख

| TOR News Network |

Anil Deshmukh Latest News : गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.नुकतंच अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने एफआयआर दाखल केला आहे.(CBI Launch Fir Against Anil Deshmukh) याप्रकरणी अनिल देशमुख यांनी मंगळवारी (ता. १०) सकाळी एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.(Anil Deshmukh Slams DCM Fadnavis)

अनिल देशमुख यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक ट्वीट केले आहे. गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी अनिल देशमुखांनी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकला, असा आरोप करण्यात आला आहे. त्यावर आता अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीस मी माझ्या अटकेची वाट पाहत आहे, असे म्हटले आहे.(Anil Deshmukh to DCM Fadnavis)

“देवेंद्र फडणवीस यांनी 4 वर्षापूर्वीची घटना उकरुन काढत माझ्याविरुध्द दिल्लीच्या मदतीने CBI FIR दाखल केली आहे. 4 वर्षापुर्वी मी गृहमंत्री असतांना जळगावच्या एका घटनेमध्ये भाजपाचे नेते गिरीष महाराज यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी जळगावच्या पोलीस अधिकाऱ्यावर दबाव टाकला होता, हा माझ्यावर आरोप आहे.

माझ्या माहितीनुसार माझ्यावर रेड टाकुन मला अट‍क करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करीत आहेत.(Fadnavis trying to arrest me says Anil Deshmukh) ज्या देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीच्या मदतीने ED-CBI ला हाताशी धरुण महाराष्ट्राचे राजकारण अतिशय खालच्या स्तरावर आणले त्यांना सांगु ईच्छीतो की, देवेंद्र फडणवीस मी माझ्या अटकेची वाट पाहत आहे”, असे अनिल देखमुखांनी म्हटले आहे.

गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत महाविकासआघाडी सरकार असताना मला मोक्का अंतर्गत अटक करण्यासाठी अनिल देशमुख यांनी खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला होता असा गंभीर आरोप केला होता. हा संपूर्ण प्रकार प्रवीण मुंडे यांनीच माझ्या लक्षात आणून दिला. त्यानंतर मी यासंदर्भात अनिल देशमुख यांना जाब विचारला होता, असे देखील गिरीश महाजन म्हणाले. याप्रकरणी नुकतच सीबीआयकडून चौकशी करण्यात आली असून आता अनिल देशमुख यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Latest Posts

Don't Miss