Saturday, January 11, 2025

Latest Posts

आईचा आशीर्वाद घेत फडणवीसांनी भरला उमेदवारी अर्ज

| TOR News Network |

Devendra Fadnavis Latest News : भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नागपूरमध्ये भाजपने जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला दबदबा दाखवून दिला आहे. फडणवीस यांनी शुक्रवारी सकाळी आईचा आशीर्वाद घेत अर्ज दाखल केला.(Fadnavis filed nomination from Nagpur)

भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे आज नागपूर दक्षिण पश्चिम या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी त्यांच्या घरामध्ये त्यांचे कुटुंबियांकडून औक्षण करण्यात आले. अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीसांचे औक्षण करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर घरातील इतर सदस्यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. महायुतीचे पुन्हा एकदा सरकार यावे यांसाठी शंखनाद केला जात आहे. देवेंद्र फडणवीस यांची यंदाची ही सहावी विधानसभा निवडणूक आहे. त्यासाठी घरातून आणि हजारो कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी राज्यातील भाजपचे महत्त्वपूर्ण नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. गडकरींच्या निवासस्थानी जाऊन फडणवीसांनी आशिर्वाद घेतले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासह दक्षिणमधून मोहन मते आणि नागपूर पूर्वीमधून कृष्णा खोपडे असे तीन नेते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जात आहे.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. फडणवीस म्हणाले की, जनतेचा आणि आईचा आशिर्वाद माझ्या पाठीशी आहे. मागच्या सगळ्या निवडणुकांमध्ये चांगला विजय मिळाला, तसाच आता सहावा विजय देखील मोठा मिळेल.(Fadnavis on election win) खूप चांगल्या मतांनी मी निवडणून येईल, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. देवेंद्र फडणवीस यांची नागपूरच्या संविधान चौकातून रॅलीला सुरुवात झाली आहे. जोरदार शक्तीप्रदर्शन, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि घोषणाबाजी दिसून येत आहे. फडणवीस यांना आशिर्वाद देण्यासाठी उत्तराखंडहून नागा साधू देखील आले आहेत.

Latest Posts

Don't Miss