Wednesday, January 15, 2025

Latest Posts

फडणवीसांचा निकटवर्तीय नेता तुतारी हाती घेणार

| TOR News Network |

Devendra Fadnavis Latest News : लोकसभा निवडणुकीतील यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील इनकमिंग जोरात सुरु झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि महायुतीमधील दिग्गज नेते पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश घेत आहेत.अशात आता पुणे शहरातील भाजपचा बडा नेते लवकरच तुतारी हाती घेण्याची दाट शक्यता आहे. (Pune Bjp Leader to join sharad pawar ncp )जर या नेत्याने साथ सोडली तर विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसणार आहे.

संजय काकडे दसऱ्यानंतर शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.(Sanjay Kakde to ledt bjp) त्यांच्या पत्नीने सुप्रिया सुळे यांची भेट घेतली होती. संजय काकडे हे राज्यसभेचे माजी खासदार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. (Sanjay Kakde close to devendra Fadnavis)गेल्या काही दिवसापासून संजय काकडे हे भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा देखील रंगल्या होत्या

पुण्यातील बडे बांधकाम व्यावसायिक असलेले संजय काकडे हे सुरुवातीला अपक्ष म्हणून राज्यसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. पुणे महापालिकेतील भाजपाच्या विजयात त्यांचं महत्तवाचं योगदान होतं. काकडे 2019 आणि 2024 मध्ये पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. पण, भाजपानं त्यांना उमेदवारी दिली नव्हती.

काकडे यांनी ऑगस्ट महिन्यात शरद पवारांची त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली होती. काकडे यांनी ती भेट वैयक्तिक कारणांसाठी असल्याचा खुलासा केला होता. पण, त्यानंतरही त्याचे राजकीय अर्थ काढण्यात आले होते.

Latest Posts

Don't Miss