Samruddhi Highway For Sale : 11 डिसेंबर 2022 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकार्पण केलेला समृद्धी महामार्ग पूर्ण झाल्यावर विकण्याची योजनाच आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली. (Dcm Devendra Fadnavis announcement to sell samrudhi mahamarg) त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. सुरुवातीला 35 हजार कोटी रुपयांना हा मार्ग तयार करताना लोकांनी राज्य सरकारचे दिवाळे निघेल, अशा वल्गना केल्या होत्या.(Samruddhi highway big news today)
आता समृद्धी महामार्ग पूर्ण तयार होण्यास 50 किलोमीटरची लांबी बाकी असताना या मार्गासंबंधी सिक्युरिटाईजेशनची ऑफर आल्याची माहिती आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आतापर्यंत समृध्दी महामार्गावर 55 हजार कोटी खर्च झाले असून तो पूर्ण झाल्यावर 60 ते 70 हजार कोटींना विकण्याची तयारी फडणवीस यांनी दर्शवली. इतक्यावर ते थांबले नाही तर या पैशातून इतर ठिकाणी नवी गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली. एका कार्यक्रमात गुंतवणूक योग्य ठिकाणी करण्याचे धडे देताना त्यांनी हे विधान केले.
युवाशक्तीमुळे विकसित भारत..
विकसित भारत हे युवकांमुळे शक्य होणार आहे. तरुणांच्या संख्येमुळे भारत 2020 ते 2035 या काळात आपल्या उच्चांकावर राहील आणि त्यानंतर 2035 ते 2050 या कालावधीत विकासाचे मार्ग स्थिर असतील. म्हणजेच 2047 पर्यंत भारत विकसित देश होईल. मोदींनी अर्थव्यवस्थेचा विस्तार करताना सर्वसामान्यांच्या गरजांवर फोकस केला. डिजिटल ट्रान्झेशनमध्ये भारत जगात पहिल्या स्थानावर आहे. त्याच बरोबर स्टार्टअप इकोसिस्टम मध्ये जगात भारत दुसऱ्या स्थानावर आहे.
महाराष्ट्र पहिल्या स्थानावर असल्याचे फडणवीस म्हणाले. मोदींनी पुढील पाच वर्षांत भारताची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या स्थानावर आणण्याचे ठरविले आहे. काँग्रेस नेते राजीव गांधी सांगत सरकारी योजनेत 1 रुपया पाठविल्यावर 85 पैशांचा भ्रष्टाचार होत होता. पण, आता मोबाईल, आधार आणि डिबीटीने एक रुपया टाकला तर तितकेच पैसे लाभार्थ्यांना मिळतात, हे मोदींनी करप्शन फ्री सिस्टिमने शक्य केल्याचे फडणवीसांनी सांगितले.
गडचिरोली देशाची स्टील कॅपिटल होणार..
विदर्भात नक्षलवाद प्रभावित जिल्हा म्हणून परिचित असलेला गडचिरोली देशाचे स्टील कॅपिटल होत असल्याची माहिती फडणवीस यांनी या कार्यक्रमात दिली. समृध्दी महामार्ग तयार झाल्याने विदर्भाचे चित्र बदलल्याचे ते म्हणाले. तर समृध्दी महामार्गावरील जिल्ह्यांचा विकास होत आहे. गडचिरोलीत आताच 30 हजार कोटींची आणि या महिन्यात 10 हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे. आर्टीफिशल इंटेलिजन्स च्या माध्यमातून जगभरात 22 कोटी नोकऱ्या जाणार होत्या. पण, त्याच वेळी आर्टीफिशल इंटेलिजन्सच्या माध्यमातून 25 कोटी नव्या नोकऱ्या मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. जग आणि जॉबचे नेचर बदलत असल्याचे फडणवीस म्हणाले.