Friday, January 17, 2025

Latest Posts

देवाभाऊ चांगला माणूस पण… खा.सुळे

| TOR News Network |

Supriya Sule Latest News : नुकतेच एका मुलाखतीत पवार कुटुंब एकत्र येणार नाही, असे अजित पवार यांनी म्हटले होते. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाले, ही निवडणूक वैचारिक लढाई आहे. हे कुटुंबाची निवडणूक नाही. महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायविरोधात आम्ही निवडणुकीत उतरला आहोत. मी कुटुंबासाठी लढत नाही. मी महाराष्ट्राच्या जनतेसाठी लढत आहे. आम्ही जनतेसाठी आलो आहे. शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाही, महागाई भ्रष्टाचार, महिलांसाठी लढत आहे. आम्ही राजकारणात समाजासाठी आलो आहे असे सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांनी सुनावले. (Supriya sule on ajit pawar) यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांनाही धारेवर धरले.(Supriya slams devendra fadnavis)

अदानी यांच्यासोबत झालेल्या बैठकीवरुन अजित पवार यांनी यु टर्न घेतला आहे. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी पहिल्याच दिवशी म्हटले होते, हा विषय मला माहीत नाही. त्यांनी यु टर्न घेतले आहे, त्यांनाच हा प्रश्न विचारा. अजित पवार यांनी शरद पवार यांनी आपल्याकडे लक्ष दिले नाही, असा दावा केला होता. त्या वक्तव्याचा सुप्रिया सुळे यांनी समाचार घेतला. त्या म्हणाल्या, चार वेळा कोणाला उपमुख्यमंत्री केले, मला, रोहितला की युगेंद्रला?

शेतकऱ्यांचे सोयाबीन आणि कापसाचे पीक आले. पण त्याला हमीभाव मिळत नाही. सोयाबीन आणि कापसाला 7 ते 10 हजार क्विंटल हमीभाव देणार अशी घोषणा करण्यात आली. परंतु प्रत्यक्षात हमी भाव मिळाला नाही. माझी सगळ्यात मोठी लढाई भाजपसोबत आहे.(supriya sule on bjp) कांद्यावरून आमची लढाई आहे. पियुष गोयल यांच्यासोबत भांडण झाले. कांदा नाफेड आणि एनसीसीएफ मध्ये भ्रष्टाचार सुरू आहे. देवेंद्र फडणवीस चांगला माणूस पण कॉपी करून पास झाला आहे. (supriya sule on devendra fadnavis) 2 पक्ष फोडून उपमुख्यमंत्री झाले आहे, असा टोला सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लावला.

राज्याच्या भल्यासाठी 84 वर्षांचा माणूस फिरत आहे. (sule on sharad pawar) त्यांना मुख्यमंत्री पद नको, सत्ता नको आहे. फक्त चांगले सरकार हवे आहे, त्यासाठी ते फिरत आहे, असे शरद पवार यांचे नाव घेता सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

Latest Posts

Don't Miss