Saturday, January 11, 2025

Latest Posts

ईडीची केजरीवालांच्या पर्सनल सेक्रेटरीसह १२ नेत्यांच्या घरी छापेमारी

| TOR News Network | Delhi ED Raid Today On AAP Leaders: दिल्लीत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आज (६ फेब्रुवारी) १२ हून अधिक ठिकाणी ईडीकडून छापेमारी केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार आपचे राज्यसभा खासदार एनडी गुप्ता यांच्या घरी देखील ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. (ED Raid On AAP Mp In Delhi)

सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे खासगी सचिव विभव कुमार यांच्या घरी देखील तपास सुरु आहे, याशिवाय दिल्ली जल बोर्डाचे माजी मेंबर शलभ यांच्या निवासस्थानी देखील छापे टाकले जात आहेत. (ED Raid On Kejrewals Personal Secretary)दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी ही छापेमारी केली जात आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील आम आदमी पक्षाशी संबंधीत नेत्यांच्या घरी ही छापेमारी मनी लॉड्रिंग प्रकरणात केली जात आहे. मात्र अद्यार नेमक्या कोणत्या मनी लॉड्रिंगच्या प्रकरणात ही कारवाई होत आहे हे स्पष्ट करण्यात आलेले नाहीयेत. (Money Laundering Case ED Raid Aap Leaders)

भाजपकडून आपच्या आमदारांना 25 कोटींची ऑफर

विरोधक संपवायचा डाव

ईडीचा सतत गैरउपयोग केला जातो आहे.विरोधकांना भाजपात आण्यासाठी त्यांना ईडीची भीती दाखवली जात आहे.विरोधकांना मानसिक त्रास देण्यात येत आहे.भाजपला विरोधक संपवायचे आहे.देशात हूकुमशाही सुरु आहे.मात्र ये जनता है सब जाणती हे.येणाऱ्या निवडणूकीत लोकं भाजपला धडा शिकवेल असे मत खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या होणाऱ्या कारवाईवर दिलेले आहे.

Latest Posts

Don't Miss