Sunday, January 12, 2025

Latest Posts

Delhi त वायू प्रदूषणाचे भीषण सावट Work From Home च्या सूचना – अवजड वाहनांवर बंदी

Delhi Air Pollution 2023: दिल्लीत मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण वाढले आहे, त्याचा थेट परिणाम दिल्लीकरांच्या आरोग्यावर होत आहे. केजरीवाल सरकारने या संदर्भात  एक उच्च स्थरीय बैठक बोलवली आहे. (Delhi Air Pollution ) सरकारने प्रदूषणापासून सर्वाधिक प्रभावीत एनसीआर मध्ये कडक निर्बंध लागू केले आहेत. यात शाळा बंद सोबतच वर्क फ्राॅम होमच्या सूचना केल्या आहेत. (Due To Poor Air Quality in Delhi Government tooks Hard Decision )

दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून हवेची गुणवत्ता खालावली आहे.त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यावर उपाय योजनेसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रर्यावरण मंत्री यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलवली आहे.यामध्ये जास्त प्रभावीत असलेल्या भागात कडक निर्बंध लागण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी सरकारने वायू प्रदर्शनामुळे एनसीआर मध्ये कार्यालयातील पन्नस टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्राॅम होमच्या सूचना दिल्या आहेत. त्याशिवाय शाळेंना सुट्टी देण्याच्या निर्णयावर देखील हालचाली सुरु झाल्या आहेत. तर काही शाळांनी आॅनलाईन क्लासेस घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.सरकारने वाहतूक नियमात देखील कडक केले आहेत.जस्त प्रदूषण असलेल्या भागात अवजड वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. दिल्लीत एअर क्वाॅलिटी इंडेक्सने ५०० ची पातळी ओलांडली आहे.ही परिस्थिती अत्यंत धोकादायक मानल्या जात आहे. या भीषण वायू प्रदूषणाच्या समस्येला तोंड देण्यासाठी दिल्ली सरकारच्या हालचाली वाढल्या आहेत. दिल्लीत परत आता मुखपट्ट्यांनी प्रवेश केला असून नागरिकांना अपल्या सुरक्षेसाठी त्याचा वापर सुरु केला आहे.

श्रीलंका-बांगलादेश सामना होणार रद्द ?

दिल्लीत आज सोमवारी ६ नोव्हेंबर रोजी श्रीलंका-बांगलादेश दरम्यान क्रिके़ट विश्वचषकातील सामने होणार आहे. मात्र येथे वाढते वायू प्रदूषण बघता हा सामना रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Srilanka Bangladesh Match In Trouble Due To Delhi Air Pollution) सामना खेळवावा का ? या संदर्भात आयसीसी तज्ज्ञ डाॅक्टरांचा सल्ला घेऊन आपला पुढील निर्णय देणार आहे. प्रदूषणाची पातळी जास्त नसली आणि डाॅक्टरांनी सामना खेळण्यास परवानगी जरी दिली तरी खेळाडू मास्क घालून खेळण्याची शक्यता आहे. प्रदूषणामुळे दोन्ही संघाने आपले सराव सत्र रद्द केले आहे. या पूर्वी देखील २०१७ मध्ये श्रीलंका आणि भारता दरम्यान कसोटी सामना झाला होता. तेव्हा देखील वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात झाले होते. त्यावेळी श्रीलंकेच्या खेळाडूंनी मास्क घालून सामना खेळता होता.

Latest Posts

Don't Miss