Saturday, January 11, 2025

Latest Posts

एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी

| TOR News Network | Threat Call to Eknath Khadse : एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याच्या धमकीचे फोन आले आहेत. चार वेगवेगळ्या नंबरवरून त्यांना ही धमकी आल्याचं समजलंय. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकच खळबळ उडाली आहे. (Phone call to kill khadse)

राजकीय वर्तृळातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याच्या धमकीचे फोन आले आहेत. चार वेगवेगळ्या नंबरवरून त्यांना ही धमकी आल्याचं समजलंय.(From 4 different number death call to khadse)

“पर्वापासून काल रात्रीपर्यंत मला धमकीचे फोन आले आहेत. (Many threat Call to Eknath Khadse) आम्ही तुम्हाला मारू, तुमचा जीव घेऊ अशी धमकी फोनवरून देण्यात आलीये. सदर नंबर ट्रेस केल्यानंतर एक अमेरिका आणि एक उत्तर प्रदेशातील असल्याचं दिसत आहे.” (Death call from america to eknath khadse)

” याबाबत पोलीस स्टेशला मी तक्रार दाखल केली आहे. (Khadse complaint to police) पोलीस आता या प्रकरणी चौकशी करतायत. तपासात काय समोर येतं ते पाहावं लागेल, असंही एकनाथ खडसेंनी यावेळी सांगितलं.

अमेरिका आणि लखनऊ येथून हे फोन आलेत. या आधी देखील मला असे धमकीचे फोन आले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी दाऊदच्या पत्नीशी फोनवर माझं संभाषण झाल्याचा आरोप माझ्यावर करण्यात आला होता. मात्र त्यावेळी देखील तपासात एका व्यक्तीने खोडसाळपणा करत एका सॉफ्टवेअरवरून हा फोन कॉल झाल्याचं दाखवलं होतं, हे देखील एकनाथ खडसेंनी यावेळी स्पष्ट केलं.

काय दिली धमकी

छोटा शकील आणि दाऊद इब्राहिम तुम्हाला मारणार आहे, असे धमकी देणाऱ्याने पहिल्यांदा फोनवरुन सांगितले. त्यानंतर खडसे यांनी तो प्रकार गंभीरतेने घेतला नाही. त्यानंतर दुसऱ्या फोनवरुन पुन्हा फोन आला की तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही काहीच केले नाही. तुम्हाला ही लोक मारणार आहेत. चार ते पाच वेळा असे फोन आल्यानंतर एकनाथ खडसे यांनी तक्रार दाखल केली आहे. हे फोन अमेरिका आणि उत्तर प्रदेशातून लखनऊमधून आल्याचे स्पष्ट झाले आहे.

Latest Posts

Don't Miss