Thursday, January 16, 2025

Latest Posts

‘बदला पुरा’, ‘देवाचा न्याय’, ‘देवाभाऊ सुपरफास्ट’ अशा बॅनर बद्दल फडणवीसांचे थेट मत

| TOR News Network |

Devendra Fadnavis Latest News : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर व न्यायालयाकडून करण्यात आलेल्या अनेक शंका या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी रोखठोक मत मांडत पोलिसांच्या कृतीचे समर्थन केले आहे. (Fadnavis support badlapur case police encounter) एखाद्याने हल्ला केला तर पोलीस टाळ्या वाजवत बसणार नाही, असे त्यांनी म्हटले.तर फडणवीस यांचे बंदूक हाती घेऊन पोस्ट समाज साध्यमांवर व्हायरल होत आहे तर काही ठिकाणी तसे बॅनर लावण्यात आले आहे त्या बद्दलही फडणवीस यांनी आपले मत मांडले.(Dcm Fednavis on badlapur flex)

यावेळी देवेंद्र फडणवीस यांना अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात उपस्थित करण्यात आलेल्या आरोपांविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, एखाद्या गुन्हेगाराचा एन्काउंटर व्हावा, या मताचे आम्हीदेखील नाही. मला व्यक्तिश: कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात कायद्याचे पालन व्हावे, असे वाटते. कायद्याच्या माध्यमातूनच गुन्हेगाराला शासन झाले पाहिजे. ही सगळी प्रक्रिया वेगाने पार पडली पाहिजे. अक्षय शिंदे याचा मृत्यू पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात झाला. आमचे पोलीस एखाद्याने हल्ला केल्यावर टाळ्या वाजवत बसणार नाहीत, असे देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.

अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरनंतर मुंबई, ठाणे आणि बदलापूर परिसरात अनेक ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स लागले होते. या बॅनर्सवर ‘बदला पुरा’, ‘देवाचा न्याय’, ‘देवाभाऊ सुपरफास्ट’ अशा उपाध्या देऊन देवेंद्र फडणवीस यांचा गृहमंत्री म्हणून गौरव करण्यात आला होता. याविषयी देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, हा प्रकार अयोग्य आहे. (Fadnavis on his badlapur banner) एन्काउंटरसारख्या घटनेचे उदात्तीकरण कधीच होता कामा नये, असे फडणवीसांनी म्हटले. या एन्काउंटरची गुन्हे अन्वेषण विभागाकडून (CID) नि्ष्पक्ष चौकशी होईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अक्षय शिंदेला बंदूक चालवण्याचे कोणतेही प्रशिक्षण नसताना तो पोलिसांची रिव्हॉल्व्हर हिसकावून, त्याचे लॉक उघडून फायरिंग करु शकतो का? पोलीस नॉर्मली डोक्यात गोळी घालतात का?, अशा प्रश्नांची सरबत्ती न्यायाधीशांनी केली होती. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला न्यायाधीशांवर टीका करायची नाही.(Fadnavis on court judge) पण मला त्यांना विचारायचं आहे की, तुमच्यासमोर कोणी बंदूक घेऊन मारायला आलं तर तुम्ही हा विचार करत बसाल का की असं मारायचं का तसं, असा प्रतिप्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला होता.

Latest Posts

Don't Miss