Saturday, January 11, 2025

Latest Posts

आम्ही लोकशाही पद्धतीने त्यांचा कोथळा बाहेर काढू – फडणवीस

| TOR News Network |

Devendra Fadnavis On Shivaji Maharaj Statue collapse : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे ही दु:खदायक घटना आहे. यावरुन कोणीही राजकारण करु नये. या दुर्घटनेनंतर पुतळ्याचे भग्न अवस्थेमधील काही फोटो जाणीवपूर्ण व्हायरल करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा मावळा हे फोटो कधीही व्हायरल करणार नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांवर निशाणा साधला.(DCM FAdnavis on Opposition) “अफझलखानासारख्या कितीही प्रवृत्ती चालून आल्या तरी आम्ही लोकशाही पद्धतीने त्याचा कोथळा बाहेर काढू” अस म्हणत फडणवीसांनी विरोधकांवरच टीका केली.(Fadnavis Slams Mahavikas aghadi)

फडणवास म्हणालेत “मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करणाऱ्या शिल्पकारांप्रमाणेच नौदलाला तेथील सोसाट्याचा वारा आणि खाऱ्या हवेमध्ये लोखंड किती गंजेल याचं अकलन करता आलं नसावं,” असं फडणवीस म्हणाले. “पुतळा कोसळणं हे दु:खदायक असून त्यामुळे वेदना झाल्या. मात्र त्यावरुन सुरु असलेलं राजकारण अधिक वेदनादायी आहे.(Fadnavis on shivaji maharaj statue) हा पुतळा राज्य सरकारने उभारलेला नव्हता. तो नौदलाने चांगल्या हेतूने उभारला होता. आम्ही नौदलाच्या मदतीने यापेक्षाही मोठा पुतळा पुन्हा उभारु,” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

सिंधुदुर्गमधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी कोसळल्यानंतर या प्रकरणावरुन राज्यात राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका होताना दिसत आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनानिमित्त लोकार्पण करण्यात आलेला हा पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या पुतळ्याच्या दर्जाबद्दल, कंत्राटाबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. असं असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया नोंदवली आहे.

मंगळवारी फॉरेन्सिक टीमने ज्या ठिकाणी पुतळा पडला तेथील पहाणी करुन पुतळ्याच्या तुकड्यांचे काही नमुने तपासणीसाठी घेऊन गेले. या ठिकाणाची पहाणी केल्यानंतर प्रसारमाध्यांमशी बोलताना या टीमने, आम्ही नमुने गोळा केले असून आता या आधारे अहवाल तयार केला जाईल, असं म्हटलं आहे. तसेच हा अहवाल येण्यासाठी नेमके किती दिवस लागतील याबद्दल सध्या तरी काहीच सांगू शकत नसल्याचं फॉरेन्सिक टीममधील अधिकाऱ्यांनी सांगितलं.

Latest Posts

Don't Miss