Sunday, January 12, 2025

Latest Posts

आगे, आगे देखिये होता हैं क्या….

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सूचक विधान

| TOR News Network | Devendra Fadnavis Reaction On Ashok Chavan Left Congress : राज्याच्या राजकारणात आज मोठी घडामोड झाली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. (Ashok Chavan left Congress )त्यामुळे ते आता भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा जोरात सुरु झाली आहे. अशोक चव्हाण यांनी विधान भवनात जाऊन राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. त्यानंतर या चर्चेने जोर पकडला. अशात नरीमन पॉइंट येथील भाजपा मुख्यालयात पत्रकार परिषद झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. काही माजी नगरसेवकांचा भाजपामध्ये प्रवेश झाला. त्याचवेळी अशोक चव्हाण यांचा भाजपा प्रवेश होईल, अशी चर्चा सुरु झालेली. पण आज हा प्रवेश झाला नाही. भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला.त्यावर त्यांनी आपले मत मांडत सूचक विधान केले आहे. (Fadnavis on Ashok Chavan Resignation)

त्यावेळी फडणवीस पत्रकारांना म्हणाले, मी तुमच्याकडूनच हे ऐकतोय. त्यानंतर त्यांनी सांगितलं की, “काँग्रेसमधले अनेक चांगले नेते भाजपाच्या संपर्कात आहेत. (DCM Devendra Fadnavis Reaction on Ashok Chavan)ज्या प्रकारे काँग्रेस पक्षाची वाटचाल सुरु आहे, त्यातून जे जनतेचे नेते आहेत, जनतेशी कनेक्ट आहे, त्यांची गुदमर होतेय. देशभरात हाच ट्रेंड आहे. जनतेचे नेते भाजपामध्ये प्रवेश करतायत. काही मोठे नेते भाजपात येतील हा विश्वास आहे. तुम्हाला एवढच सांगेन आगे, आगे देखिये होता हैं क्या”

फडणवीस म्हणाले आम्ही असं फोडाफोडीच टार्गेट घेऊन चालत नाही. सगळ्याच पक्षातील लोक आमच्या संपर्कात आहेत. अनेकांना वाटतय की, आपण भाजपासोबत जावं, काहीजण निर्णय घेत आहेत. मोठ्या प्रमाणात भाजपासोबत मोदीजींसोबत जाव अशी भावना सर्वपक्षीय नेत्यांमध्ये पहायला मिळतेय असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Latest Posts

Don't Miss