Saturday, January 11, 2025

Latest Posts

फारच कंटाळा आला तर भजन करायच असतं

अजित पवार यांचा शरद पवार यांना जिव्हारी लागणार टोमणा

| TOR News Network | Ajit Pawar On Sharad Pawar : महायुतीत बारामती लोकसभेची जागा कोणत्या पक्षाला जाणार हे अध्याप ठरलेले नाही.मात्र पण बारामतीमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित आहे.(Sunetra pawar for Baramati Lok Sabha) तर  शरद पवार गटाकडून त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे निवडणूक रिंगणात असणार आहेत हे देखील वातावरणातू स्पष्ट झाले  आहे.(Supriya sule to Contest Baramati) यंदा प्रथमच पवार विरुद्ध पवार असा बारामतीमध्ये सामना रंगणार आहे.(In Baramati Pawar Vs Pawar) त्यासाठी दोन्ही बाजूंकडून जोरदार मोर्चेंबांधणी सुरु आहे.(Sunetra pawar vs Supriya sule in baramati) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल अख्खा दिवस बारामतीमध्ये घालवला. यावेळी त्यांनी सभा घेतल्या.त्यातून त्यांनी काका शरद पवार यांना जिव्हारी लागणार टोमणा मारला.(Ajit Pawar on sharad pawar)

सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार हे संभाव्य उमेदवार बारामती लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत आहेत. मतदारसंघातील आजी-माजी आमदार, प्रतिष्ठीत नागरीक यांच्या भेटीगाठी सुरु आहेत. दोन्ही पवारांसाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे. म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अख्खा दिवस बारामतीमध्ये घालवला. बारामतीमध्ये त्यांनी सभांचा धडाका लावला. मतदारांशी संपर्क साधला.यावेळी त्यांनी शरद पवार यांनाही टोमणा लगावला.

काही चुकलं तर कान धरायचा

अजित पवार यांनी काल बारामतीमध्ये एका सभेला संबोधित करताना आपले काका शरद पवार यांना जिव्हारी लागणार टोमणा मारला. “उतारवयातील लोकांनी आशिर्वाद देण्याच काम करायच असतं. काही चुकलं तर कान धरायचा असतो. फारच कंटाळा आला तर भजन करायच असतं. सध्या खूप जणांना फोन येत आहेत. खूप जणांना बोलावल जातय. भावनिक केलं जात आहे. भावनिक व्हाय़च की विकास कामांच्या मागे उभं रहायच हे तुम्ही ठरवायचय” असं अजित पवार मतदारांना म्हणाले.

शरद पवार यांचे फोटो व नाव वापरु नका – सुप्रीम कोर्ट

बारामती हा दोन्ही पवारांचा बालेकिल्ला

“आपल भलं करुन घ्यायच. तालुक्याचा सर्वांगिण विकास करायचा की, तालुक्यातील विकासकामांना खीळ निर्माण करायची हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे” असं अजित पवार सभेला संबोधित करताना म्हणाले. याआधी बारामतीमध्ये अजित पवार यांनी कधी इतका जोर लावला नव्हता. मतदानाच्या एक-दोन दिवस आधी येऊन ते मतदारसंघाचा आढावा घ्यायचे. पदाधिकारी-कार्यकर्ते यांना सूचना करायचे. पण यावेळी अजित पवार स्वत: मतदारसंघामध्ये फिरतायत. पुढच्या राजकीय वाटचालीसाठी सुनेत्रा पवार यांचा बारामतीमध्ये विजय अजित पवार यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण बारामती हा दोन्ही पवारांचा बालेकिल्ला आहे.

Latest Posts

Don't Miss