Sunday, January 12, 2025

Latest Posts

बारामती लोकसभेत पवार विरुद्ध पवार

अजित पवारांचे थेट शरद पवारांना आव्हान

Ajit Pawar On Loksabha Election 2023: महायुतीमध्ये एकत्र बसून जागावाटपाची चर्चा केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूरमध्ये स्पष्ट केले असतानाच बारामती, शिरूर, रायगड आणि सातारा या गेल्या वेळी जिंकलेल्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी परस्पर जाहीर करून टाकले. (We Will Contest Loksabha Election in Baramati say DCM Ajit Pawar)  बारामती मतदारसंघ लढण्याचे जाहीर करून अजित पवार यांनी काका शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना आव्हानच दिले आहे.त्यामुळे आता बारामतीत लोकसभेत पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार असल्याचे चित्र दिसणार आहे.

पुढे होणाऱ्या लोकसभेत आम्ही पूर्ण ताकदीने मैदात उतरणार आहोत. महायुतीत भाजप २६, तर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट उर्वरित २२ जागा लढवतील, असे सुतोवाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये केले होते. त्यावर शिंदे गट आणि अजित पवार गटात प्रतिक्रिया उमटल्यावर फडणवीस यांनी जागावाटप अद्याप अंतिम झालेले नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, भाजपचा एकूणच सूर फडणवीस यांच्या विधानातून स्पष्ट झाला.या पार्श्वभूमीवर कर्जत येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैचारिक मंथन बैठकीत बोलताना अजित पवार यांनी बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या गेल्या वेळी राष्ट्रवादीने जिंकलेल्या चारही जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढणार असल्याचे जाहीर केले. महायुतीमधील जागावाटप अद्याप अंतिम झालेले नसताना अजित पवार यांनी परस्पर जागावाटपाचे सूत्र जाहीर केले.२०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिला होता. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळीही आम्ही तटस्थ राहून भाजपला मदत केली होती. त्यामुळे आता काही खूप वेगळे केले असे नाही. भिन्न विचारसरणी असलेले पक्ष एकत्र आल्याची देशात अनेक उदाहरणे आहेत. ममता बॅनर्जी, मेहबुबा मुफ्ती, फारूक अब्दुल्ला नितीश कुमार यांनीही भाजपशी युती केली होती. त्यांनी आपल्या पक्षाचा विचार सोडला नाही. आम्हीपण विचार सोडणार नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.बारामती, सातारा, शिरूर आणि रायगड या चारही जागा निवडून आणण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न आम्ही करणार आहोत. भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार नसलेल्या काही जागा लढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

Latest Posts

Don't Miss