Sunday, January 12, 2025

Latest Posts

अहो कुठे आहात तुम्ही, अजित बोलतोय….

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा अधिकाऱ्याला थेट फोन

Ajit Pawar Phone Call News Kolhapur : अजित पवार हे त्यांच्या कामाचा धडाका आणि आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. आज कोल्हापुरातल्या तालमीत जाऊन त्यांनी आपल्या याच शैलीची झलक पुन्हा एकदा दाखवली. कोल्हापुरातल्या तालमीत क्रीडा अधिकारी वेळेवर आले नसल्याने अजित पवारांनी त्यांना फोन करुन, मी अजित बोलतोय तुम्ही कुठे आहात अशी विचारणा केली. (Ajit Pawar In Kolhapur Calls Officer)  कोल्हापुरात अजित पवारांनी केलेल्या या फोनची चर्चा रंगली आहे.

अजित पवार अधिकाऱ्याला काय म्हणाले?

अजित पवार म्हणाले, “अहो कुठे आहात तुम्ही अजित बोलतोय, तुम्ही कुठे आहात आता? तालमीत कधी येणार आहात? लवकर शिस्तीत या….” (Ajit Pawar In Kolhapur Calls Officer to Come Early)

राज्याचे उपमुख्यंत्री अजित पवार त्यांच्या परखड स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. अनेकदा त्यांच्या सडेतोड शब्दात ते उत्तरे देत असतात. कामाच्या बाबतीत अजित पवार हे आग्रही असतात. त्यात कुचराई करणाऱ्यांना ते अनेकदा धारेवर धरतात हेदेखील दिसून आलं आहे. अशात आता कोल्हापूरमध्ये अजित पवार यांनी केलेला हा फोन चर्चेत आहे.

कोल्हापुरातल्या गंगावेश तालमीला अजित पवारांनी दिली भेट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज गंगावेश तालमीला भेट दिली आहे. यावेळी अजित पवार यांना शाहू महाराजांची मूर्ती देऊन स्वागत करण्यात आलं. गंगावेश तालमीची अजित पवार यांनी पाहणी केली आहे. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखचे उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे. तालीम दुरुस्त व्हावी ही प्रामुख्याने मागणी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली.

कोल्हापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार आज नेहमीप्रमाणे ॲक्शन मोडवर दिसले. तालमीची परिस्थिती पाहण्यासाठी अजित पवार तालमीत गेले मात्र क्रीडा अधिकारी घरीच होते. गंगावेश तालमीतील पाहणीनंतर अजित पवारांनी तातडीने अधिकाऱ्यांना फोन केला. अजित पवार यांनी सकाळ PWD अधिकारी आणि जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना फोन करून तातडीने येण्याची तालमीत येण्याची केली सूचना केली.

Latest Posts

Don't Miss