| TOR News Network | Sanjay Raut Latest Press : यंदाची निवडणूक ही दिवसेंदिवस भाजपसाठी अधिकच कठीण होत चालली आहे. त्यामुळं भाजपकडून आणि त्यांच्या सर्व सहकारी पक्षांकडून हेमंत सोरेन आणि इतर अनेक नेत्यांना अशा प्रकरे त्रास देण्याचं काम सुरुच राहणार आहे. आज या देशात कोणीही सुरक्षित नाही.(no one is secure in india) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नुकतीच ईडीनं अटक केली. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. (Sanjay Raut Latest Press Today)देशात सध्या कोणीही सुरक्षित नाही, जंगलराज सुरु आहे. देशात सध्या रशिया आणि चिनी राजकीय पॅटर्न सुरु असल्याचंही ते म्हणाले. (The pattern going on in India is similar in Russia and China)
कोणालाही अटक होऊ शकते, कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. जंगलराज सुरु आहे. जसं रशियात पुतीनचा सुरु आहे. चीनमध्ये देखील सुरु आहे, तोच पॅटर्न इथं सुरु आहे ज्याला गुजरात पॅटर्न म्हटलं जातं, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.यांनी केजरीवालांना खोट्या खटल्यात फसवलं गेलं असून तर त्यांचा पक्ष मोडून त्यांचं सरकार पाडू इच्छित आहेत. (Kejriwal was cheated in a false case)केजरीवालांकडं पूर्ण बहुमत आहे. भाजपनंही दिल्लीत निवडणूक लढवली आहे तरी पाच जागांपेक्षा जास्त मिळालेल्या नाहीत.
जरी केजरीवाल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत नसतील तरी भाजपला त्यामुळं त्रास होण्याचं कारण नाही. पण केजरीवालांसाठी हा मोठा महासंग्राम आहे. कारण देशातील महत्वाचा दुसरा स्वातंत्र लढाच सुरु असून यासाठी तुम्ही तुरुंगातूनही काम करु शकता, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्रीपदावर असणं किंवा नसणं ही मोठी गोष्ट नाही. पण केजरीवालांना लोकांनी मुख्यमंत्री म्हणून निवडलं आहे.(People elected kejriwal as cm) ईडी आणि सीबीआयनं निवडलेलं नाही, ते लोकांचे नेते आहेत, लोकांनी त्यांना बहुमत दिलं आहे. त्यामुळं आता लोकच ठरवतील की त्यांनी मुख्यमंत्रीपदावर रहावं किंवा नाही, अशी भूमिकाही यावेळी संजय राऊत यांनी मांडली.