Monday, November 18, 2024

Latest Posts

नितेश राणे यांनी केलेली टीका भोवली : अजामीनपात्र वॉरंट जारी

| TOR News Network |

Nitesh Rane Latest News : भाजप नेते व आमदार नितेश राणे यांना एका प्रकरणात टीका करणे चांगलेच भोवले आहे. नितेश राणे यांची टीका अनेकदा बोचरी असते. त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर केलेल्या टीकेवरुन त्यांनी अब्रुनुकसानीचा दावा केला. तो दावा लक्षात घेत कोर्टाने नितेश राणे यांच्याबाबत अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. (Non-bailable warrant against Nitesh Rane)

ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत व भाजप नेते आमदार नितेश राणे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात.(Nitesh Rane Slams UBT Shivsena) नितेश राणे यांनी केलेल्या टीकेवरुन संजय राऊत यांनी कोर्टात धाव घेतली होती. (Sanjay Raut in Court Against Nitesh Rane) राऊत यांनी माझगाव कोर्टात ॲड. मनोज पिंगळे यांच्यामार्फत नितेश राणेंविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणाची कोर्टाने दखल घेतली असून त्याची मंगळवारी सुनावणी होणार होती. मात्र आमदार नितेश राणे यांनी उपस्थिती लावली नाही. त्यामुळे कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे नितेश राणेंना अटक होण्याची शक्यता आहे.

पार पडलेल्या सुनावणीवेळी राणे यांच्या वकिलांनी उपस्थित राहण्यापासून सूट विनंती केली होती. मात्र, खटल्यात वारंवार गैरहजर राहणाऱ्या नितेश राणे यांना दिलासा देण्यास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आरती कुलकर्णी यांनी स्पष्ट नकार दिला. (No Relief to Nitesh Rane Says Court) तसेच थेट अजामीनपात्र वॉरंट बजावले. यापूर्वीही कोटने अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. तसेच राणे हे खटल्यासाठी कोर्टाने दिलेल्या तारखांना सातत्याने गैरहजर राहत होते. यावर कोर्टाने नाराजी व्यक्त केली असून राणे खटल्यात गांभीर्याने वागत नसल्याची नाराजी न्यायालयाने बोलून दाखवली आहे. त्यामुळे अटक टाळण्यासाठी नितेश राणेंना कोर्टामध्ये हजर राहणे गरजेचे आहे.

Latest Posts

Don't Miss