Thursday, January 16, 2025

Latest Posts

तिकीट वाटपासाठी काँग्रेसकडून निकष : अनेकांचे पत्ते कटणार

| TOR News Network |

Congress Party Latest News :  आगामी विधानसभेच्या निवडणूकीत उमेदवारी मिळावी याकरिता इच्छुकांनी फिल्डींग लावने सुरु केले आहे. (VidhanSabha Election Latest News) लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. त्यामुळे विधानसभेसाठी काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या वाढताना दिसत आहे. अशात उमेदवारी देताना काँग्रेसने एक फॉर्म्यूला तयार केला आहे. (Congress Formula for Vidhansabha) शिवाय काही निकष ही ठरवले आहेत. (criteria Set For Congress willing candidate) त्यानुसारच पक्षाचे तिकीट दिले जाणार आहे. त्यामुळे विद्यामान आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळणार की नाही याची चर्चा सुरू झाली आहे. शिवाय त्यांची धाकधूकही वाढली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरूद्ध महायुतीच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Mahavikas Aghadi Vs Mahayuti in vidhansabha) लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला यश मिळालं. राज्यात मोठा पक्ष काँग्रेस ठरला. मात्र असं असून देखील विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसचे आमदार फुटले.(Congress Mla Split In Vidhanparishad) काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी समोर आली. या गोष्टी पाहात आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जपून पावलं टाकण्याचे ठरवले आहे. काँग्रेसचे जे विद्यमान आमदार आहेत, त्यांची चाचपणी केली जाणार आहे. (Congress Testing current MLA) प्रत्येक आमदारांच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे.शिवाय प्रत्येक मतदार संघाचा सर्वे ही केला जाणार आहे. (Congress to Survey Mla) त्यानंतर तिकीत देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. जर एखाद्या आमदारा बद्दल नकारात्मक अहवाल आला तर त्याला तिकीट नाकारलं जाणार आहे. त्यासाठी काँग्रेस आपला अंतर्गत सर्वे करणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची पहिली बैठक पार पडणार आहे.  काँग्रेस पक्षाला लोकसभा निवडणुकीमध्ये यश मिळाल्यामुळे सर्वाधिक जागांचा प्रस्ताव काँग्रेस पक्ष ठेवणार आहे, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. मात्र आता सर्व आमदारांचा सर्वे केला जाणार आहे. (Congress to survey all Mla) त्यानंतर काँग्रेस आपल्या जागांवर दावा करणार असल्याची माहिती मिळत आहे. जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पडाव्यात यासाठी काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे. त्यादृष्टीने काँग्रेसने रणनिती आखली आहे. (Congress planned a strategy )

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मते फुटली होती. (Congress Leader Cross Voting In Vidhanparishad) पक्षाच्या काही आमदारांनी पक्ष आदेशा विरोधात मतदान केले होते. त्यांच्या विरोधात अजूनही कोणतही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यांच्या विरोधात काय कारवाई केली जाते याकडे ही सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षातूनही तशी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे पक्षा विरोधात भूमिका घेणाऱ्यां सोडलं जाणार नाही हा संदेश जाईल. अशा स्थितीत त्या आमदारांवरही या कालावधीत कारवाईची दाट शक्यता आहे.

Latest Posts

Don't Miss