Monday, November 18, 2024

Latest Posts

ऑस्ट्रेलियाचा विजयी षटकार: India Vs Australia Final World Cup 2023

Cricket World Cup Final 2023 latest News: कमी धावसंखेचे लक्ष्य आणि त्यात ऑस्ट्रेलियालाच्या मिचेल स्टार्कची घातक गोलंदाजीसोबतच ट्रॅव्हिस हेडने केलेल्या शानदार शतक व मार्नस लॅबुशेनच्या अर्धशतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियालाने भारताला 6 गडी राखून सहाव्यांदा विश्वचषक उंचवला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत आज एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला.  भारतीय संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत सर्वबाद २४० धावा केल्या व ऑस्ट्रेलियासमोर २४१ धावांचे विजयी लक्ष्य ठेवले. मिळालेल्या विजयी लक्ष्यचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात निराशाजनक झाली. सर्वात घातक फलंदाज डेव्हिड वॉर्नरला मोहम्मद शमीने दुसऱ्याच षटकात बाद केले.त्यानंतर जसप्रित बुमराने मिचेल मार्शला परतावले. बुमराने आपला कहर कायम ठेवत स्टीव्हन स्मिथला बाद केले व भारताला मोठा दिलासा दिला.अशात ऑस्ट्रेलियाची स्थिती 3 बाद 47 धावा झाली. तर ट्रॅव्हिस हेडने संयमी खेळी साकारत धावफलक हालता ठेवला.त्याला मार्नस लॅबुशेनने योग्य साथ दिली. हेडने संघासाठी महत्वाची खेळी करत 58 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले व संघाला मजबूत स्थितीत नेले.ऑस्ट्रेलियाने 28 व्या षटकात 150 धावांचा पल्ला गाठला. यात मार्नस लॅबुशेन व ट्रॅव्हिस हेडने शंभर धावांची भागेदारी केली. लॅबुशेन व हेडची जोडी तोडण्यासाठी भारताने सर्व पर्याय आजमावले. मात्र यश मिळाले नाही. अखेर ट्रॅव्हिस हेड व मार्नस लॅबुशेन या जोडीने ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाने भारताला 6 गडी राखून विजय नोंदवला. हेडने 137 तर लॅबुशेन नाबाद 58 धावा केल्या व 43 षटकातच विजय संपादित केला.

त्तपूर्वी फलंदाजीला आ.लेल्या भारतीय संघाची सुरुवात काही खास झाली नाही. सामना सुरु होताच ऑस्ट्रेलियाने भारताला 30 धावांवर पहिला झटका दिला. शुभमन पाचव्या षटकात मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि रोहितने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. रोहितने दुसऱ्याच षटकापासून आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. मात्र तो अर्धशतकाच्या अवघ्या 3 धावा दूर असताना ग्लेन मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर झेल बाद झाला. मोठा फटका मारण्याच्या नादात त्याचा अप्रिम झेल ट्रॅव्हिस हेडने घेतला. त्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यर आल्या पावले परतला. अशात भारत 10 व्या षटकात 3 बाद 81 धावांवर होता. दरम्यान टीम इंडियाच्या धावांचा वेग मंदावला. बऱ्याच कालावधीपासून भारताच्या फलंदाजांना एकही चौकार मारता आला नाही.२० षटकांनंतर भारताची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात ११५ धावा अशी होती. विराट कोहली ४० चेंडूत ३९ आणि के.एल राहुल ३४ चेंडूत १९ धावांवर खेळत होते. विराटने संयमी खेळी साकारत अर्धशतक केले. त्यानंतर मात्र टीम इंडियाला मोठा झटका बसला.भारताचा महान फलंदाज विराट कोहली २९ व्या षटकात बाद झाला. पॅट कमिन्सने आपल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर विराटला क्लीन बोल्ड केले. कोहलीने ६३ चेंडूत ५४ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत चार चौकार मारले. विराट कोहली बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवच्या जागी रवींद्र जडेजाला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले.केएल राहुलने चांगली फलंदाजी करत यंदाच्या विश्वचषकातील दुसरे अर्धशतक झळकावले. त्यानंतर जोश हेझलवुडने टीम इंडियाला पाचवा धक्का दिला. जडेजा २२ चेंडूत ९ धावा करून बाद झाला. टीम इंडियाची धावसंख्या ५ बाद १७८ धावा झाली.अशात केवळ १७८ धावांवर भारतीय संघाचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. केएल राहुल १०६ चेंडूत ६६ धावांवर खेळत असताना मिचेल स्टार्कने त्याला झेल बाद केले.अशात भारत  ४२ षटकानंतर ६ गडी गमावून २०७ धावा केल्या होत्या. मोहम्मद शमी ६ धावांवर झेलबाद झाला. मिचेल स्टार्कची ही तिसरी विकेट घेतली. टीम इंडियाने ४४ षटकानंतर ७ बाद २१२ धावा केल्या.मात्र टीम इंडियाचा आठवा फलंदाज जसप्रीत बुमराहही बाद झाला. भारताने ४६ षटकात आठ विकेट गमावत २२१ धावा केल्या होत्या.त्यानंतर भारताचे इतर फलंदाज बाद झाले आणि भारताने एकूण 50 षटकात सर्वबाद 240 धावा केल्या.

रोहित शर्माने मोडला ख्रिस गेलचा विक्रम

रोहित शर्माने ख्रिस गेलचा वनडेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम मोडला आहे. ख्रिस गेल इंग्लंडविरुद्ध ८५ षटकार मारले होत, आता रोहित ८६ षटकारांसह एका ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारत, एका संघाविरुद्ध सर्वाधिक षटकारा मारणारा फलंदाज ठरला आहे.

चाहता विराटला भेटण्यासाठी थेट मैदानात

टीम इंडियाला आता विराट कोहली आणि केएल राहुलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. १६ षटकांनंतर धावसंख्या ३ बाद १०१ धावा आहे. कोहली ३४ आणि राहुल १० धावांवर खेळत आहेत. विराटने चालू विश्वचषकात ७००हून अधिक धावा केल्या आहेत. सामन्यादरम्यान एक चाहता विराटला भेटण्यासाठी थेट मैदानावर पोहोचला.

Latest Posts

Don't Miss