| TOR News Network |
Sanjay Raut Latest News : किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा हा खटला दाखल केला होता.(medha Somaiya file case against mp raut) त्यावर आता माझगाव सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे. ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत हे अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी ठरले आहेत. न्यायालयाने संजय राऊत यांना दोषी ठरवताना 15 दिवसांचा तुरुंगवास आणि 25 हजार रुपये दंड ठोठावला आहे.( magistrate court order 15 days jail to mp sanjay raut)
सत्र न्यायालयाने हा निकाल दिलाय. आता संजय राऊत या निर्णयाला वरच्या कोर्टात म्हणजे उच्च न्यायालयात आव्हान देतात का? हे लवकरच कळेल. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांची पत्नी मेधा सोमयय्यावर सार्वजनिक प्रसाधनगृहाच बांधकाम आणि देखभालीच्या कामात 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. (sanjay raut blame 100 cr fraud on medha Somaiya wife of kirit Somaiya) संजय राऊत यांचे हे आरोप तथ्यहीन आणि बदनामीकारक आहेत, असं म्हणत मेधा सोमय्या यांनी त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता.
सोमय्या हे युवा प्रतिष्ठान नावाची प्रतिष्ठान चालवत होते. त्यांनी खोटी बिलं देऊन पैसे उकळले. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याची कारणं दाखवून हा घोटाळा झाला आहे. एकूण 100 कोटींचा हा घोटाळा आहे. घाण करून ठेवणारे म्हणतील पुरावे कुठे आहेत? पुरावे कुठे आहेत हेही माहिती आहे. युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्रीमती सोमय्या आणि त्यांच्या कुटुंबाने केलेला हा घोटाळा आहे, असं राऊत म्हणाले होते.