Saturday, January 18, 2025

Latest Posts

एकनाथ शिंदे अजित पवारांमध्ये वार पलाटवार

| TOR News Network |

Eknath Shinde Latest News : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेमधील ‘गुलाबी रंगांची राज्यभरात चर्चा सुरू आहे. (Ajit Pawar jan samman yatra) पण याच गुलांबी रंगावरून एका ठिकाणी बोलताना “मला गुलाबी होण्याची गरज नाही, माझ्या कपड्याचा रंग पांढरा , तो कुठल्याही रंगाला फेंट करू शकतो, कुणातही मिसळू शकतो, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना डिवचले होते.(Cm Shinde on Ajit Pawar) मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला अजित पवार यांनीही सडेतोड उत्तर दिले आहे.(Ajit Pawar Counter Attack on cm shinde)

अजित पवार यांनी लालबागचा राजा आणि सिद्धिविनायक बाप्पाचे दर्शन घेतले. या दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदेंनी गुलाबी जॅकेटवरुन केलेल्या टीकेला उत्तर दिले.(Ajit Pawar on Cm Shinde) ‘पांढरा रंग सगळ्यात चांगला आणि शुभ्र आहे, मुख्यमंत्र्यांचं हे म्हणणं योग्य आहे. मी पण आज पांढरा शुभ्र शर्ट घातलाय, अशी कोपरखळी अजित पवार यांनी मारली. तसेच, गणेशोत्सव आहे कशाला उगाच हे हा बोलला तो ते बोलला विचारता,’ अशी टीपण्णीही त्यांनी यावेळी केली.

अजित पवार म्हणाले, “आज लालबागचा राजा, चिंतामणी आणि सिद्धिविनायकाचे दर्शन घायला आलोय. पण आपल्यामुळे गर्दीच्या वेळेत लोकांना त्रास नको, हा माझा विचार असतो. आज वर्किंगडे असल्यामुळे इथे जास्त गर्दी नाही. बापाकडे काय मागितलं नाही. पण राज्यात सुख, समाधान, शांती मिळू दे. सर्वांची भरभराट होऊ दे, भले होऊ दे. असंच मागितलं. राज्यात ओला दुष्काळ असला तरी त्याकडे आमचे लक्ष आहे. राज्य आणि केंद्र सरकारकडून जी मदत करायची आहे, त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना या परिस्थितीतून बाहेर कराडण्यासाठी आमचे काम सुरू असल्य़ाचेही त्यांनी नमुद केले.

Latest Posts

Don't Miss