Saturday, January 11, 2025

Latest Posts

आज दिल्लीत भाजप कोर कमिटीची बैठक, फडणवीसांचा होणार फैसला ?

| TOR News Network |

Delhi Bjp Meeting Latest News : लोकसभेचा निकाल अपेक्षित निकाल न लागल्याने फडणवीसांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली होती.त्यांना  पक्षाच्या संघटनाची जबाबदारी मिळावी अशी त्यांची मागणी आहे. त्यानंतर आता दिल्लीतून हालचाली सुरु झाल्या आहेत. (Delhi bjp Meeting) दिल्लीत आज मंगळवारी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आहे.(Bjp Important Meeting In Delhi) या बैठकीला महाराष्ट्रातील भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे हे नेते हजर राहणार आहेत. फडणवीसांच्या राजीनाम्याच्या इच्छेवर कोअर कमिटीत निर्णय होणार का?, याकडे सर्वांचं लक्ष आहे.(Delhi Bjp Core committee Meeting Today) तसेच राज्यातील मंत्री मंडळाच्या विस्तारा संदर्भात देखील निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

2 केंद्रीय मंत्र्यांच्या आढाव्यानंतर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष पदावरही निर्णय होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात भाजप 23 वरुन 9 खासदारांवर आलीय. (Bjp Came Back in Lok Sabha) महाराष्ट्रातल्या पराभवाची जबाबदारी, फडणवीसांनी स्वीकारली आणि संघटनेचं काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

अर्थात देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला तर बरेच बदल करावे लागतील.(Fadnavis Resignation decision today) उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची परवानगी दिलीच तर नवा उपमुख्यमंत्रीपदाचा चेहरा भाजपला निवडावा लागेल. फडणवीस गृहमंत्री सुद्धा आहेत. त्यामुळे फडणवीसांनी राजीनामा दिलाच तर नवा गृहमंत्री कोण असेल? हेही भाजपला निश्चित करावं लागेल.

देवेंद्र फडणवीसांना संघटनेचं मोठं, प्रदेशाध्यक्षपद दिल्यास चंद्रशेखर बावनकुळेंना पदमुक्त व्हावं लागेल.(Bawankule to left BJP state president) बावनकुळे प्रदेशाध्यक्ष पदावरुन पदमुक्त झालेच, तर त्यांना मंत्रिमंडळात स्थान द्यायचं का? याचाही निर्णय होईल. महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याची माहिती आहे. त्याआधी फडणवीसांवरुन नेमकं काय करायचं, याचा फैसला भाजपच्या नेतृत्वाला करावा लागेल.

Latest Posts

Don't Miss