Friday, January 17, 2025

Latest Posts

वादग्रस्त पुजा खेडकरचे पंकजा मुंडेशी राजकीय संबंध : दिला लाखो रुपयांचा चेक

| TOR News Network |

IAS Pooja Khedkar Latest News : वादग्रस्त आयएएस अधिकारी पुजा खेडकर यांचा कुटुंबीयांचे पंकजा मुंडे (pooja Khedkar Pankaja Munde) यांच्याशी राजकीय संबंध असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्याला कारण ठरला तो सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका चेकचा फोटो. पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला 12 लाखांची मदत केल्याचा दावा केला जात आहे. (Manorama khedkar cheque to munde) 3 ऑक्टोबर 2023 ला 12 लाखांची मदत केल्याचा उल्लेख असलेला एका चेकचा फोटो सोशल मीडियावर फिरत आहे.

पूजा खेडकरांचे वडील दिलीप खेडकरांचे पंकजा मुंडेंच्या कुटुंबीयांशी जवळचे संबंध? असल्याचा सवालही उपस्थित करण्यात येत आहे. तसंच, पंकजा मुंडे यांना लोकसभा किंवा राज्यसभेची उमेदवारी मिळावी यासाठी दिलीप खेडकरांनी नगरमधल्या मोहोटा देवीला साकडं घातलं असल्याचीही सूत्रांची माहिती आहे. (dilip khedkar for pankaja munde) दिलीप खेडकरांचे भाऊ माणिक खेडकर पाथर्डीतील भाजपचे तालुकाध्यक्ष राहिलेत, असंही समोर येतंय. त्यामुळं पूजा खेडकर यांच्या कुटुंबीयांचे पंकजा मुंडे यांच्याशी संबंध असल्याच्या चर्चांना जोर आला आहे.(khedkar family close to munde family)

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा 12 लाखांचा चेक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जीएसटी विभागाने पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावर कारवाई केल्यानंतर मनोरमा खेडकर यांनी बारा लाख रुपयांचा चेक मदत म्हणून दिल्याचं बोललं जातंय.(manorama khadker help 12 lakh check to pankaja munde ) भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने 19 कोटी रुपयासाठी कारवाई केली होती. त्यानंतर मुंडे समर्थकांकडून मदतीचा ओघ राज्यभरातून येत होता. यावेळी मनोरमा खेडकर यांनी परिवर्तन प्रतिष्ठानच्या भालगाव नावाने बारा लाख रुपयांचा चेक दिला होता. हा चेक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यामुळे पुन्हा एकदा मनोरमा खेडकर या चर्चेत आल्या आहेत. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी समर्थकांनी देऊ केलेली रक्कम नाकारली होती. मात्र मनोरमा खेडकरांनी दिलेल्या या चेकची आता सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांनी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेची उमेदवारी मिळावी म्हणून नगर जिल्ह्यातील मोहटा देवीला दीड किलो चांदीचा मुकुट अर्पण करण्याचा नवस खेडकर कुटुंबीयांनी केला होता आणि त्यानुसार हा चांदीचा मुकुट 22 मार्च रोजी अर्पण करण्यात आला होता.(khedkar family donate silver crown) पंकजा मुंडे यांच पक्षकडून पुनर्वसन व्हावं आणि त्यांना पद मिळावं अस साकडं खेडकर यांनी देवीला घातलं होतं.

Latest Posts

Don't Miss