Sunday, January 12, 2025

Latest Posts

काँग्रेसच्या गटबाजीवर बोलणे झिशान सिद्धीकीला भोवले

मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून हकालपट्टी

| TOR News Network | Zeeshan Siddiqui Latest News : सध्या काँग्रेसचा खराब काळ सुरु आहे.पक्षातील अनेक दिग्गज नेते व कार्यकर्ते पक्षाला राम राम ठोकत आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात,माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रेवेश घेतला आहे.यांच्यानंतर मुंबई काँग्रेसमधील अल्पसंख्यक चेहरा बाबा सिध्दीकी यांनीही पक्षाला जय महाराष्ट्र ठोकत अजित पवार यांच्या गटात प्रवेश केला.या संपूर्ण घडामोडीत आता झिशान सिद्धीकी देखील काँग्रेस सोडणार अशा चर्चा रंगत होत्या.त्या पहिलेच पक्षाने झिशान सिद्धीकीवर कारवाई केली आहे. (Congress Took Action On Zeeshan Siddiqui)

झिशान यांनी पक्ष सोडण्यापूर्वी कारवाई

४८ वर्ष काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर बाबा सिद्दीकी यांनी पक्ष सोडला. १० फेब्रुवारी रोजी ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहे. त्यावेळी झिशान सिद्दीकी यांनी आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे म्हटले होते. (I will Be in Congress Says Zeeshan) परंतु झिशान यांनी पक्ष सोडण्यापूर्वी काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई केली आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन झिशान यांना हटवण्यात आले आहे. (Congress Mla Zeeshan Siddique)आता मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अखिलेश यादव यांना देण्यात आली आहे.(Akhilesh Yadav New Youth Congress President Of Mumbai)

बाबा आणि झिशान सिद्दीकी अजित पवारांच्या गटात ?

अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसचे नुकसान

काँग्रेस पक्षातून महत्त्वाचे नेते बाहेर पडत आहेत. त्याचा काँग्रेसने विचार करायला हवा. हे नेते पक्ष सोडत आहे, त्यावर चर्चा व्हायला हवी, असे नेते झिशान सिद्दीकी यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटले होते. आपण सध्या काँग्रेसमध्येच आहे. कोणत्या पक्षात जाण्याचा आपण विचार केलेला नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. अंतर्गत गटबाजी आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमुळे काँग्रेसचे नुकसान होत असल्याचे त्यांनी म्हटले होते.(In Congress internal factionalism)

Latest Posts

Don't Miss