Sunday, January 12, 2025

Latest Posts

काँग्रेसच्या बड्या नेत्यांची आज नागपुरात तातडीची बैठक

| TOR News Network | Congress Meeting In Nagpur : काँग्रेसच्या सर्व बड्या नेत्यांची आज बैठक नागपूरात बोलवण्यात आली आहे. तसा निरोप सर्व दिग्गज नेत्यांना पोहचला असून ही बैठक आज रात्री ९ वाजता होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिला आहे. (Congress urgent meeting in nagpur) काँग्रेसमध्ये २ जागांवरुन विशाल पाटील व वर्षा गायकवाड नाराज असल्यामुळे ही बैठक बोलवण्यात आल्याचे बोलले जात आहे.असे असले तरी नागपूरातच ही बैठक का ? यामागे काँग्रेसची दुसरी खेळी तर नाही ना यावरही आता शंका उपस्थित केली जात आहे.(Congress calls Urgent meeting today in Nagpur)

जागा वाटपावरुन काँग्रेसमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. मुंबईत जागा न मिळाल्याने माजी मंत्री वर्षा गायकवाड नाराज आहेत.(Former minister Varsha Gaikwad is upset) यासंदर्भातील नाराजी त्यांनी जाहीरपणे मांडली होती. तसेच सांगलीमधील जागा काँग्रेसला मिळाली नाही. (Sangli seat For uddhav thackeray) या जागेवर उद्धव ठाकरे यांनी जागा वाटपापूर्वीच उमेदवार जाहीर केला होता. ती जागा उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहिली. त्यावरुन काँग्रेस नेते विशाल पाटील नाराज झाले असून त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करण्याची तयारी चालवली आहे. (vishal patil upset on congress) यामुळे काँग्रेस नेत्यांची तातडीची बैठक नागपुरात बोलवण्यात आली आहे.

सांगलीतील तिढा सोडवण्यासाठी दिल्लीतून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला नागपुरात दाखल झाले आहे. (Maharashtra  Congress in-charge Ramesh Chennithala reached nagpur) त्यांच्यासोबत काँग्रेस नेत्यांची बैठक बोलवण्यात आली. त्यासाठी आमदार विश्वजीत कदम आणि आमदार विक्रम सावंत, पृथ्वीराज पाटील यांना तातडीने नागपूरकडे येण्याचे निरोप देण्यात आला आहे. सोमवारी रात्री 9 वाजता नागपूरमध्ये बैठक होणार आहे. त्यासाठी त्यांना बोलवले आहे. या बैठकीत काँग्रेस नेते चेन्निथलासह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात उपस्थिती राहणार आहे.

विशाल पाटील अर्ज दाखल करणार

काँग्रेस नेते विशाल पाटील मंगळवारी सांगली लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.(Vishal patil to contest sangli independent) त्यामुळे तोडगा काढण्यासाठी ही बैठक बोलवली आहे. सांगलीत महाविकास आघाडी म्हणजेच उबाठा शिवसेनेकडून पैलवान चंद्रहार पाटील रिंगणात उतरले आहे. (Chandrahar Patil from sangli loksabha)  भाजप उमेदवार संजय काका पाटील निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे सांगतील लढत तिरंगी होणार आहे. विशाल पाटील यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीचा उमेदवार अडचणीत येणार आहे.

चंद्रहार पाटील 19 एप्रिल रोजी अर्ज भरणार

शिवसेना महाविकास आघाडीचे सांगली लोकसभेचे उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील हे 19 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.(Chandrahar patil will Nomination forms will be filled on 19 april) यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस नेते सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती शिवसेना ठाकरे गट सांगली जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी दिली.

Latest Posts

Don't Miss