Saturday, January 11, 2025

Latest Posts

आमच्यामुळे काँगेसच्या जागा वाढल्यात – खा. संजय राऊत

| TOR News Network |

Sanjay Raut Latest News : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी  काँग्रेसला चांगलेच खडेबोल सुनावले. काँग्रेसच्या नेत्यांनी (Sanjay Raut Slams Congress Leaders) थेट मुख्यमंत्रीपदावर दावा करु नये, अजून जागावाटप बाकी आहे. (Sanjay Raut On Cm post) आमच्यामुळं काँग्रेसच्या जागा वाढल्या असल्याचं मोठं वक्तव्य राऊतांनी  केलं. काँग्रेसचे वरीष्ठ नेते असा काही निर्णय घेणार नाहीत. सर्व लहान मित्र पक्षांनाही सामावून घेण्याचे प्रयत्न करावाच लागेल असंही राऊत म्हणाले.

महाविकास आघाडीची आज जागावाटपासंदर्भात महत्वाची बैठक पार पडणार आहे. (Mahavikas Aghadi Important meeting) जो जिथं जिंकणारा उमेदवार असेल त्यालाच संधी दिला जाईल असंही संजय राऊत म्हणाले. काही मतभेद झालेच तर पुन्हा बैठक होईल, वरिष्ठ नेते एकत्र बसतील असंही राऊत म्हणाले. दरम्यान, राज्यात तयार होत असलेल्या तिसऱ्या आघाडीसंदर्भात देखील राऊतांना विचारण्यात आलं. यावेळी राऊत म्हणाले की, तिसरी आघाडी ही केवळ सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी असते. कारण ती विरोधकांची मत फोडते असं ते म्हणाले.(third front to benefit ruler party )

दरम्यान, आजच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्धा दौऱ्यावर देखील संजय राऊतांनी टीका केली. (Sanjay raut on modi visit to wardha) मोदी येतात, मोदी जातात. ते कसलं उद्घाटन करतात, त्यांनाच माहिती नसतं असा टोला राऊतांनी लगावला. उद्योगांचं काय? आजही इथले उद्योग गुजरातला जातायत. जम्मू काश्मीरला मोदींनी पूर्ण राज्याच्या दर्जा देण्याची मागणी केलीय. मग आमचा जो भाग गुजरातला नेलाय, तोही परत द्या असे राऊत म्हणाले. बदलापूर प्रकरणाताल आपटे आणि कोतवालला वाचवायचं काम मुख्यमंत्री करतायेत. कारण ते त्यांच्या मुलाच्या मतदारसंघातील लोक आहेत असंही राऊत म्हणाले.

Latest Posts

Don't Miss