Saturday, January 18, 2025

Latest Posts

काही जणांनी कोट शिवले पण त्यांना मंत्री केले नाही :  पुढे बघा काय होतंय

| TOR News Network |

MLA Kailas Gorantyal Latest News : काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी पत्रकारांशी बोलताना नवाब मलिक, अजित पवार आणि भाजपवर टीका केली.(MLA Kailas Gorantyal On Nawab Malik) अजित पवार भाजपसोबत गेले त्याचा लोकसभेत फटका बसला.पण आगामी विधानसभा निवडणुकीत यापेक्षाही जास्त वाईट हाल होतील. शिंदे गटाचे आमदार नाराज आहेत.(Kailas Gorantyal On Shinde Mla) विधिमंडळात ते काही बोलत नाही. काही जणांनी कोट शिवले पण त्यांना मंत्री केले नाही. पुढे बघा काय होतंय ते असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

विधानपरिषदेच्या 11 रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील. या निवडणुकीत सर्वात जास्त धोका भाजपला आहे.(Kailas Gorantyal on Bjp) त्यामुळे भाजप त्यांचा उमेदवार कमी करणार. पाच तारखेनंतर यावर सर्विस्तर बोलू. आम्ही त्याचे कॅल्क्युलेशन केले आहे. आम्ही कॅलकुलेटेड पक्ष आहोत. परंतु, भाजपला ओवर कांफिडेंस आहे.

राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी अजित पवार यांची साथ दिली आहे. मात्र, त्यांना कळाले पाहिजे होते की ज्या भाजपने त्यांचा अपमान केला. त्यांना पाठिंबा दिला नाही त्यांच्यासोबत कसे जायचे? मागे प्रफुल्ल पटले यांच्यावरही असाचा आरोप करण्यात आला होत.(Kailas Gorantyal On Prafful Patel) पण, त्यांना मदत करून राज्यसभेवर पाठविले. नवाब मलिक यांची अवस्था आता ‘जिंदगी भर मैं ये भूल करता रहा, धूल आईने पर थी और मैं मुंह पोछता रहा’ अशी झाली आहे. नवाब मलिक अग्नीवीर होणार आहे. अशी अवस्था करून घेण्यापेक्षा, अपमान करून घेण्यापेक्षा त्यांनी राजकिय संन्यास घ्यावा अशी खरमरीत टीकाही त्यांनी केली.(Kailas Gorantyal On nawab malik Retirement)

Latest Posts

Don't Miss