Saturday, January 18, 2025

Latest Posts

सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्य़ांवर गंभीर आरोप…रात्री १२ वाजता शिंदे

| TOR News Network | Satej Patil On Cm Shinde : काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.(Satej Patil serious allegation on cm shinde) त्या संदर्भात सतेज पाटील शिंदे यांच्याविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगात तक्रार करणार आहे. (Sataj Patil to complaint against Eknath Shinde) येथील पंचशील हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यासाठी निवडूक आयोगाकडे आपण मागणी करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (Complaint against cm to Election Commission)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे ठाण मांडून बसले आहेत. आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत. आमच्याकडे अशी माहिती आहे की, काल रात्री 12 वाजता जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी त्यांना पंचशील हॉटेलमध्ये भेटले.(Cm Meet senior officer at mid night) काही नावे काढून त्या लोकांवर कारवाया करण्याबाबत सूचना दिल्या. मला हे खरं असेल, खोटं असेल, माहिती नाही. पण माझ्याकडे माहिती आली आहे. पण याची चौकशी झाली पाहिजे,(Satej patil demand inquiry on cm shinde) अशी मागणी सतेज पाटील यांनी केली आहे.

कोल्हापुरात महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती हे उमेदवार आहेत.(Kolhapur Loksabha news) तर महायुतीकडून संजय मंडलिक हे उमेदवार आहेत. (Shahu Maharaj Chhatrapati vs Sanjay Mandalik) ते शिवसेना पक्षाचे आहेत. तर शाहू महाराज छत्रपती हे काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. संजय मंडलिक हे कोल्हापुरातले सध्याचे विद्यमान खासदार आहेत. त्यांना यावेळी शाहू महाराजांचं कडवं आव्हान आहे. कोल्हापुरात सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार प्रचार सुरु आहे. (mahavikas agadi,mahayuti Strong promotion in kolhapur) असं असताना आता कोण बाजी मारतं? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Latest Posts

Don't Miss