Sunday, January 12, 2025

Latest Posts

काँग्रेसचे बलाढ्य नेते खासदार वसंत चव्हाण यांचं निधन

| TOR News Network |

Vasant Chavan Passed Away  : नांदेडच्या राजकीय वर्तुळातून दुःखद बातमी समोर आली आहे. नांदेडचे खासदार आणि काँग्रेसचे बलाढ्य नेते वसंत चव्हाण यांचं आज हैद्राबादच्या किन्स रुग्णालयात आजारपणातून निधन झालं. (Nanded MP Vasant Chavan) वयाच्या 64 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) त्यांनी काँग्रेसमधून निवडणूक लढवली होती आणि भाजपच्या प्रतापराव चिखलीकर यांना पराभूत केलं होतं. माजी मुख्यमंत्री आणि पूर्वी काँग्रेसचे बलाढ्य नेते म्हणून ओळख असलेल्या अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे इथली लढत ही काँग्रेससाठी अत्यंत कठीण मानली जात होती. मात्र वसंत चव्हाण यांनी या मतदारसंघातून चिखलीकरांचा सहजरित्या पराभव केला होता.

लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर राज्यातील आगामी विधानसभा निवड़णुकीसाठी काँग्रेस उमेदवारांची चाचपणी सुरू होती. पक्षातील सर्व प्रमुखांनी नांदेड, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांची एकत्रित बैठक नांदेडमध्ये घेतली होती. नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाणआणि लातूरचे खासदार शिवाजीराव काळगे यांच्याकडे बैठकांचे नियोजन देण्यात आले होते. या सततच्या बैठकांमुळे वसंत चव्हाण यांची धवपळ आणि दगदग झाली होती.

वसंत चव्हाण यांचा राजकीय प्रवास

वसंत चव्हाण यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात त्यांच्या गावातून झाली. (Political journey of Vasant Chavan) 1978 साली नायगाव या त्यांच्या मूळगावचे ते सरपंच झाले. तिथून त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली. त्यानंतर 2002 ला जिल्हा परिषदेवर ते निवडून आले. त्याच काळात त्यांना विधानपरिषदेवर आमदार होण्याची संधी चालून आली. पुढे 16 वर्षे ते विधान परिषद आणि विधानसभेचे सदस्य राहिले. राष्ट्रवादीकडून ते विधानपरिषदेवर पहिल्यांदा निवडून गेले. 2009 ला अपक्ष निवडणूक लढवत नायगाव मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला. 2009 त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 2014 मध्ये पुन्हा एकदा त्यांची विधानसभेवर निवड झाली. 2019 च्या निवडणुकीत मात्र त्याचा पराभव झाला. अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख मात्र अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतरही ते काँग्रेसमध्ये राहिले. नुकतीच लोकसभेची निवडणूक त्यांनी लढवली. चव्हाण यांनी 59 हजार 442 मतांनी चव्हाणांनी चिखलीकरांचा पराभव केला.  वसंतराव चव्हाण यांना 5,28,894 मते मिळाली तर  प्रताप पाटील चिखलीकरांना 4,69,452  मतं मिळाली होती.

Latest Posts

Don't Miss