Saturday, January 11, 2025

Latest Posts

काँग्रेस लागली कामाला : मुंबईत उशिरा बैठक 

| TOR News Network |

Congress Meeting Latest News : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात दमदार यश मिळाले. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची मुंबईत उशिरा बैठक पार पडली. (Congress Vidhansabha Late night Meeting) या बैठकीला महाराष्ट्रातील अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची काल रात्री उशिरा मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली.(Congress Meeting For vidhansabha) नरिमन पॉइंटमधील मित्तल टॉवर या ठिकाणी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला काँग्रेसचे प्रमुख नेते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण आणि यशोमती ठाकूर यांच्यासह विश्वजीत कदम, सतेज पाटीलही उपस्थित होते.(Congress Leaders Meeting At mumbai) तसेच या बैठकीला काँग्रेसच्या राज्यातील आमदारांनीही हजेरी लावली. या बैठकीत प्रामुख्याने विधानसभा निवडणुकीबद्दल चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

काँग्रेसच्या या बैठकीत ज्येष्ठ नेत्यांनी प्रत्येक जिल्ह्यातील मतदार संघानिहाय परिस्थिती जाणून घेतली. लोकसभेला कोणकोणत्या मतदारसंघात काँग्रेस पक्षाला यश मिळाले आणि त्याचा फायदा विधानसभेला कशा पद्धतीने होईल यावर सुद्धा विचार मंथन झाले.(Congress Leader Discussion on vidhansabha Election) तसेच महाविकास आघाडी म्हणून लढल्यास काँग्रेसच्या वाटेला कोणत्या जागा फायदेशीर असतील यासंदर्भात सुद्धा या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Latest Posts

Don't Miss