Saturday, January 11, 2025

Latest Posts

काँग्रेसने दावा केलेल्या जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवार

| TOR News Network |

UBT Shivsena Latest News :  लोकसभेत ठाकरे गटाने सांगलीची जागा परस्पर जाहीर करुन टाकली होती. अशात काँग्रेसला अडचणी आल्या होत्या. काँग्रेसचे नेते विशाल पाटील हे अपक्ष लढले आणि निवडून आले. तेव्हा सेनेचे चंद्रहार पाटील मोठ्या फरकाने पराभूत झाले होते. आता विधानसभेत देखील ठाकरे गटाने तसेच पावले उचलली आहेत. ठाकरे यांनी जाहीर केलेलेया दुसऱ्या यादीत ज्या जागांवर वाद आहे त्या जागेवरील उमेदवारही जाहीर केले आहेत.(Uddhav Thackeray 2nd list candidate declared) त्यामुळे काँग्रेस त्याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Congress in trouble by Thackeray shivsena)

शिवसेना ठाकरे गटाने दुसऱ्या यादीत होल्डवर असलेल्या अजय चौधरी यांना शिवडीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांना पहिल्या यादीत स्थान मिळाले नव्हते. त्याच बरोबर वडाळ्यातून माजी महापौर श्रद्धा जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. भायखळा मतदार संघ काँग्रेसला मिळावा अशी मागणी करण्यात आली होती. त्या मतदार संघाबाबत चर्चाही सुरूहोती. काँग्रेसचे मधुकर चव्हाण या मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र त्या आधीच शिवसेना ठाकरे गटाने या जागेवर उमेदवार जाहीर केला आहे. तिथून मनोज जामसुतकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

या शिवाय धुळे शहर मतदार संघातून अनिल गोटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर नाशिकच्या देवळाली मतदार संघातून योगेश घोलप यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर बहुचर्चीत कणकवली विधानसभा मतदार संघातून संदेश पारकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांची लढत भाजपच्या नितेश राणे यांच्या बरोबर होणार आहे. कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघातून कोणाला उमेदवारी मिळणार याकडेही सर्वांचे लक्ष होते. ठाकरेंनी इथून सचिन बासरे यांना मैदानात उतरवले आहे.

Latest Posts

Don't Miss