Saturday, January 11, 2025

Latest Posts

पत्रकार परिषदेत जिवंत खेकडा : रोहित पवारांविरोधात तक्रार

| TOR News Network | Rohit Pawar And Crab : राज्य सरकारच्या कारभाराविरोधात माहिती देताना आमदार रोहित पवार पत्रकार परिषदेत प्रतिकात्मकरित्या जिवंत खेकडा घेऊन आले होते. (Live crab in press conference) पण यावरुन भाजपनं त्यांच्याविरोधात थेट निवडणूक आयोगात धाव घेतली आहे. यावरुन आता रोहित पवारांनी भाजपला धारेवर धरत त्या खेकड्याचं नेमकं काय केलं? हे देखील सांगितलं आहे (Rohit pawar explanation on crab)

रोहित पवारांनी ट्विट केलं की, भर दिवसा राज्याची तिजोरी पोखरणाऱ्यांचं प्रतीक म्हणून पत्रकार परिषदेत मी खेकडा दाखवल्यामुळं भाजप चांगलंच रक्तबंबाळ झाल्याचं दिसतंय. यातूनच त्यांनी माझ्याविरोधात थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करून आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचं दर्शन घडवलं आहे.(Complaint Against rohit pawar to Election Commission)

वास्तविक मी दाखवलेला खेकडा हॉटेलमध्ये खाण्यासाठी वापरण्यात येणार होता आणि नंतर तो नदीत सोडून दिला त्यामुळं खरंतर त्याचा जीव वाचला. पण तिकडं भाजपची मात्र यामुळं तडफड सुरू झाली आहे. याचं कायदेशीर उत्तर मी देईलच पण तुम्ही काय म्हणणार अशा या बावचळलेल्या राजकीय खेकड्यांना? असा सवालही त्यांनी केला आहे.

दरम्यान, पेटा या प्राणीमित्र संघटनेनं देखील रोहित पवारांविरोधात निवडणूक आयोग आणि शरद पवार यांना पत्र लिहून त्यांनी राजकीय प्रचारासाठी प्राण्याला त्रास दिल्याची तक्रार केली आहे.(PETA Letter to ECI and Sharad Pawar) पेटानं आपल्या पत्रात म्हटलं की, सन २०१३ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार निवडणूक प्रचारादम्यान, गाढव, बैल, हत्ती आणि गाईंच्या वापरावर बंदी घातली होता.

यामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे निर्देश दिले होते. पेटानं रोहित पवारांना देखील पत्र लिहून त्यांच्याकडील खेकडा आमच्याकडं सोपवावा आम्ही त्याची देखभाल करु असंही पत्रात म्हटलं आहे.

Latest Posts

Don't Miss