Thursday, January 16, 2025

Latest Posts

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठठ्ल-रुक्मिणीची महापूजा संपन्न

| TOR News Network |

Eknath Shinde Latest News : आषाढी एकादशीनिमित्त आज  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी  पत्त्नीसह विठ्ठल-रुक्मिणीचे शासकीय महापूजा पार पडली. (Government Mahapuja by Cm Shinde) महापूजा संपन्न झाल्यावर पंढरपूर नगरीत जमलेल्या वारकरण्याची विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला सुरुवात झाली.  (Pandharpur Ashadi wari)दर्शन घेण्यासाठी वारकरी, भाविकांनी पहाटेपासूनच वारकऱ्यांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या.

मुख्यमंत्र्यांसह नाशिक जिल्ह्यातील अंबासन येथील बाळू शंकर अहिरे आणि आशा बाळू अहिरे या वारकरी दाम्पत्यालाही  शासकीय महापूजेला उपस्थित राहण्याचा मान मिळाला.‌ (Balu shankar Ahire Pandharpur Mahapuja)मुख्यमंत्र्यांनी पूजा केल्यानंतर   राज्यात भरपूर पाऊस पाणी पडू दे आणि माझा बळीराजा सुखी, समाधानी राहू दे, असं साकडं आपण विठुरायाच्या चरणी घातलं, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी सांगितलं.(Cm Shinde Pandharpur Darshan)

विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेसाठी अकरा पत्रा शेड भाविकांनी  भरून गेले होते. गेल्या पंधरा दिवस केलेली पायी वारी ही फक्त या  सावळ्या विठुरायाच्या दर्शनाने पावन झाली होती. भाविकांचे डोळे, हृदय जणू  या एका क्षणासाठी आतूरलेले होते. या महापुजेनंतर मंदिरातील सभामंडपात मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.(Pandharpur Mahapuja Today)

याप्रसंगी बोलताना  मुख्यमंत्री शिंदे यांनी पंढरपूराच्या विठ्ठल मंदिरासाठी मोठी घोषणा केली. (Cm Shinde Big Statement)पंढरपूरला विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. या भाविकांना कमीत कमी वेळेत विठुरायाचे पदस्पर्श दर्शन घेता यावे, यासाठी पंढरपुरात टोकण दर्शन व्यवस्था सुरू करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

तिरुपती बालाजीच्या धर्तीवर पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी  टोकण पद्धत  केली जाईल.(Now Token System for Darshan at Pandharpur) यासाठी राज्य सरकारकडून तब्बल १०३ कोटींचा निधीही दिला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.सध्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी १७ ते १८ तास लागतात. पण टोकण व्यवस्था सुरू झाल्यावर केवळ दोन तासातच भाविकांना आपल्या आराध्य दैवताचे दर्शन घेता येणार आहे. (In 2 hour Darshan At Pandharpur) गोपाळपूर रस्त्यावरील पत्रा स शेड या ठिकाणी दर्शन मंडप उभारून टोकण देण्याची व्यवस्था केली जाईल.

Latest Posts

Don't Miss