Sunday, January 12, 2025

Latest Posts

अपात्रतेच्या निकालानंतर शिंदेंकडून नार्वेकरांचा पद्धतशीर गेम

मिलींद देवरांच्या प्रवेशाने दक्षिण मुंबईचे गणित बदलले

Eknath Shinde And Milind Deora Latest News Today : काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी रविवारी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. वर्षा निवासस्थानी काँग्रेस पदाधिकारी आणि अनेक उद्योगपतींसह देवरांनी एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास दाखवत शिवसेनेत प्रवेश केला.मात्र देवरा यांच्या एंट्रीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.एकनाथ शिंदे यांनी अपात्रतेचा निकाल येऊ दिला आणि नंतर देवराला पक्षात घेत नार्वेकरांचा पद्धतशीर गेम केल्याचे बोलले जात आहे. (Rahul Narvekar in Trouble for loksabha seat)

मिलिंद देवरा यांच्या प्रवेशामुळे मुंबईतल्या दक्षिण मुंबई मतदारसंघाची गणितं बिघडण्याची शक्यता आहे. (Eknath Shinde Planned A Game For Milind Deora) कारण लोकसभा दक्षिण मुंबईवरील दावा भाजपला सोडावा लागणार असून मिलिंद देवरा यांच्या शिवसेना प्रवेशामुळे भाजपला ही जागा शिंदेंना द्यावी लागणार आहे.

मागील काही दिवसांपासून भाजपने दक्षिण मुंबईसाठी तयारी सुरु केली होती. भाजपकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांची नावे या जागेसाठी चर्चेत होती. मात्र देवरांच्या प्रवेशाने गणितं बदलली आहेत. मराठी-अमराठी मतांचं समीकरण बघता भाजपला ही जागा शिवसेनेसाठी सोडावी लागणार असल्याचं दिसून येतंय.

१० तारखेला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निकाल दिला. एकनाथ शिंदे गटाचे आमदार आणि उद्धव ठाकरे गटाचे आमदार पात्र करत कुणावरही अपात्रतेची कारवाई त्यांनी केली नाही.

नार्वेकरांच्या निकालानंतर शिंदेंनी देवरांना शिवसेनेत प्रवेश दिल्याने, यामागे राजकीय खेळी असल्याचं बोललं जात आहे.(Eknath shinde play Game with Rahul narvekar) ज्या दक्षिण मुंबईच्या जागेवर नार्वेकरांचा दावा होता त्याच जागेवर आता मिलिंद देवरा हक्क सांगणार हे नक्की. त्यामुळे आधी निकाल येऊ देणं आणि मग देवरांना प्रवेश देणं; यामागे मुत्सुद्देगिरी असल्याचं बोललं जातंय.

पक्षीय बलाबल सांगायचं झाल्यास, दोन मतदारसंघातून भाजपचे आमदार, दोन मतदारसंघावर शिवसेना, त्यातील एक ठाकरे तर दुसरा शिंदे गटाचा आमदार आणि दोन जांगावर काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार येतात. त्यामुळे महाविकासआघाडीबाबत अन् महायुतीबाबत बघितलं तर सर्व घटक पक्षांचे प्रतिनिधी या लोकसभा मतदारसंघात येतात.

Latest Posts

Don't Miss