Monday, January 13, 2025

Latest Posts

संथगतीच्या मतदानावर मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

| TOR News Network |

Eknath Shinde Latest News : मुंबई येथील अनेक मतदारसंघात मोठा घोळ झालं असल्याची माहिती पुढे आली आहे. (Mumbai Voting Latest News) यात अनेक मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीमध्ये तांत्रिक बिघाड, वीज खंडित आणि इतर गैरसोयीमुळं मुंबईकरांना मनस्ताप सहन करावं लागलं. यामुळे निवडणूक आयोगाचा ढिसाळ आणि अनागोंदी कारभार समोर आल्यामुळं मतदाराने संताप व्यक्त केलाय, याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्य सचिवांना चौकशीचे आदेश दिले आहेत.(Cm Shinde Order for inquiry)

घाटकोपर, शिवाजीनग, गोवंडी आणि मानखुर्द अशा नावाजलेल्या मतदारसंघात ईव्हीएम मशीन चालत नसल्याचे निदर्शनास आलं काही ठिकाणी चक्क वीज खंडीत झाल्याचा प्रकारही घडल्यामुळं काही वेळासाठी मतदान थांबवल्याच्या घटनासमोर आल्या. (Voting stop in mumbai) यामुळं मतदारांना त्रास सहन करत ताटकळ थांबावं लागलं काही मतदार गैरसोयींमुळ मतदान न करताच माघारी फिरावं लागलं याचा थेट परिणाम मतांवर झाला आहे.(Mumbai Voters on voting)

मुंबईतील काही ठिकाण तसचं भिवंडी ठाणे आणि ठाणे कल्याण या लोकसभा मतदारसंघात मतदान अतिशय संथ गतीने मतदान झाल्याचा आरोप मतदारांनी केला आहे. (Voting slow in thane) तसचं काही राजकी नेत्यांनीही याबाबत तक्रार केली आहे. मतदान केंद्रावर लोकांची गैरसोय होत आहे असा अरोप ठाकरे गटातील प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषदत मांडला.(Uddhav thackeray on slow voting) यानंतर आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर केला व त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.

उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरु झाले अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. (DCM Fadnavis On Uddhav thackeray) मात्र राजकीय टीकेनंतर अनेक मतदान केंद्रावर अतिशय संतगतीनं मतदान सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळालं. याचे व्हिडिओ देखील समोर आले. यामुळे मतदारांनी संताप व्यक्त केला आहे. याची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले असून, निवडणूक आयोगाच्या या ढिसाळ आणि अनागोंदी कारभाराबाबत राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

Latest Posts

Don't Miss