| TOR News Network | Cm From Shivneri : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवनेरीवर एकत्र आले होते. (Shivjayanti In Shivneri) येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात वक्तव्य केले.(CM Shinde,DCM Fadnavis And Ajit Pawar On Shivneri)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिवनेरीवर आले होते. त्यांच्या हस्ते जन्म सोहळा संपन्न झाला. शिवजयंती सोहळ्यात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मनोगत व्यक्त केलं. हे राज्य छत्रपती शिवरायांच्या विचारांवर चालणारं राज्य आहे, असं सांगत राज्य सरकार राबवत असलेल्या उपक्रमांबद्दल त्यांनी माहिती दिली.
एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा दिल्या
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणादरम्यान शिवनेरीवर मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी करण्यात आली. (Cm Shinde Speech in Shivneri) मुख्यमंत्री शिंदे यांचं भाषण सुरू असताना मराठा आंदोलकांनी ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा दिल्या.(Ek Maratha Lakh Maratha) यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.(Maratha Protesters Shouted Slogans)
वाघ नख भारतात आणणार
शासनाने दांडपट्टा या शस्त्राची ‘राज्यशस्त्र ‘ म्हणून घोषणा केली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. तसेच महाराष्ट्राचे मंत्री सुधीर मुनगंटीवार वाघ नख भारतात आणणार असं देखील मुख्यमंत्री म्हणाले. शिवरायांना अभिप्रेत असलेलं सुराज्य आपल्याला निर्माण करायचं आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
उद्या विशेष अधिवेशन
शिवनेरीवरून उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले ‘मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उद्या ( मंगळवार, 20 फेब्रुवारी) विशेष अधिवेशन बोलावलं आहे. ओबीस तसेच इतर कोणत्याही समाजघटकाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हे विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे.(Special assembly For Maratha Reservation)‘उद्याच्या अधिवेशनातून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचं एकनाथ शिंदेंनी जाहीर केलं.(Special special Assembly session Tomorrow)