Thursday, January 16, 2025

Latest Posts

सीआयडी फेम अभिनेता दिनेश फडणीस (फ्रेड्रिक) यांचे निधन

लिव्हर डॅमेजने झाला मृत्यू : महिन्याभरापासून घेत होतॆ उपचार

Dinesh Phadnis Passed Away : सीआयडी मालिकेत फ्रेड्रिकची भूमिका निभावणारे व यातून घरा घरात पोहचणारे अभिनेता दिनेश फडणीस यांचे निधन झाले आहे. वयाच्या 57 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सीआयडीमध्ये दयाची भूमिका निभावणारे दयानंद शेट्टी यांनी दिनेश फडणीस यांच्या निधनाविषयीची माहिती दिली आहे. दिनेश यांचे लिव्हर डॅमेज झाले होते. गेल्या महिन्यापासून ते उपचार घेत होते.

दिनेश यांची तब्येत अचानक खूप बिघडली होती. त्यांना तुंगा रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. लिव्हर डॅमेजमुळे त्यांची तब्येत ढासळली होती. त्यानंतर त्यांचे अनेक अवयव हळुहळू निकामी झाले. मात्र त्यांची मृत्यूसोबतची झुंज अपयशी ठरली. सीआयडीमध्ये काम करणारा प्रत्येक जण त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी त्यांच्या घरी पोहोचला आहे. त्यांच्या निधनामुळे मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे.आजच दिनेश फडणीस यांच्यावर बोरिवलीतील दौलत नगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दिनेश यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबात पत्नी नयना आणि लहान मुलगी तनु आहे. भारतीय दूरचित्रवाणीवरील सर्वात प्रसिद्ध शो म्हणून आजही ‘सीआयडी’या शोचे नाव घेतले जाते. या शोमुळे दिनेश यांना घराघरात फ्रेड्रिक म्हणून ओळख मिळाली. इतर कलाकारांच्या तुलनेत दिनेश यांची फ्रेड्रिक ही भूमिका लहान मुलांना खूप आवडायची. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतही दिनेश यांनी हजेरी लावली होती. तसेच त्यांनी अनेक चित्रपटांमध्येही काम केले होते. आमिर खानच्या ‘सरफरोश’ आणि हृतिक रोशनच्या ‘सुपर 30’ या चित्रपटात त्यांनी काम केले होते. पण गेल्या एका वर्षापासून ते मनोरंजनविश्वापासून थोडे दूर होते.

Latest Posts

Don't Miss