WHO कडून गाइडलाईन : मास्क वापरण्याचा सल्ला
H9N2 Cases In China : चीन मध्ये आलेल्या H9n2 या नव्या व्हायरसने आता अवघ्या जगाचे टॆंशन वाढवले आहे. या आजारामुळे लहानमुले सर्वाधिक प्रभावीत होत आहेत. चीन मध्ये रोज सात हजार मुले रुग्णालयात दाखल होत आहे. त्यमुळे जागतिक आरोग्य संघटनेने यासंदर्भात खबरदारीचा इशारा दिला आहे. या धोकादायक व्हायरसमुळे (New Virus In China India Will Have To Take Precaution About H9n2) उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी भारत तयार असल्याचेही आरोग्य मंत्रालयातने म्हटले आहे.
चीनमधून आलेल्या कोरोनामुळे दोन वर्षांपेक्षा अधिक काळ जगातील आरोग्यव्यवस्था आणि अर्थव्यवस्था धोक्यात आली होती. कोरोनाचा व्हायरस चीनमध्ये मिळाल्यानंतर त्याचा प्रसार जगभर झाला होता. त्याच्यातून आता कुठे जग सावरला असताना पुन्हा चीनमध्ये नवीन व्हायरस आला आहे. या व्हायरसमुळे रोज सात हजार मुले रुग्णालयात दाखल होत आहे. चीनमधील उत्तर पूर्व भागात लियाओनिंग प्रातांत मुलांमध्ये रहस्यमय आजार दिसून येत आहे. या आजारामुळे मुलांच्या फुफ्फुसांना सूज येणे, श्वास घेण्यास त्रास होणे तसेच खोकला आणि खूप ताप येणे यासारखी लक्षणे दिसून येत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने या आजारासंदर्भात चीनकडून माहिती मागवली आहे.
WHO कडून गाइडलाईन
चीनमध्ये पसरलेल्या निमोनियाच्या नव्या व्हायरसमुळे WHO गाइडलाइन जारी केल्या आहेत. या गाइडलाइननुसार, लोकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. लोकांना स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, काही लक्षणे दिसल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा. तसेच सोशल डिस्टेंसिंगचे पालन आणि मास्कचा वापर करण्याचा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चीनमधील प्रकार गंभीरतेने घेतला आहे. भारतात या विषाणूचा प्रसार होण्याचा धोका खूपच कमी आहे. परंतु आरोग्य मंत्रालय या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. चीनमध्ये पसरणाऱ्या या धोकादायक व्हायरसमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी भारत तयार असल्याचेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. चीनमधून असे आजार का उद्भवतात? यावर आता चर्चा सुरु झाली आहे.