Thursday, January 16, 2025

Latest Posts

हकालपट्टीवरुन संभाजीराजेंना छगन भुजबळांचे प्रत्युत्तर

Chhagan Bhujbal Che Sambhajiraje La Uttar: जालन्यातील अंबड येथे ‘ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभा’ पार पडली. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्यावर हल्लाबोल केला होता. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी छगन भुजबळांना लक्ष्य करत मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी सरकारकडे केली होती. याला छगन भुजबळांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसताना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांत नसलेली भांडणं लावण्याचं पाप करत आहेत. सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण करत असेल तर सरकारची देखील हीच भूमिका आहे का? हे स्पष्ट करावे अन्यथा छगन भुजबळ यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करावी,” असं संभाजीराजे छत्रपतींनी ‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर म्हटलं होतं.त्यावर आता छगन भुजबळ म्हणाले, “मी संभाजीराजे छत्रपती यांचा सन्मान करतो. कारण, आमच्या हृदयात मागासवर्गीयांसाठी लढणारे राजर्षी शाहू महाराज आहेत. शाहू महाराजांच्या गादीवर तुम्ही बसले आहात. तुम्ही कुठल्याही एका समाजाचे नाहीत, तर सर्वांचे आहात. मग, तुम्ही एका समाजाची बाजू घेऊन कसं काय बोलू शकता?”मला आमदारकी आणि मंत्रीपदाची काळजी नाही, असं भुजबळांनी म्हटलं आहे. ते इगतपुरी येथे सभेला संबोधित करत होते.

Latest Posts

Don't Miss