Thursday, January 16, 2025

Latest Posts

छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर? स्वत:च केला खुलासा

Chhagan Bhujbal Speaks On BJP Entry : मंत्री छगन भुजबळ सध्या भाजपच्या वाटेवर आहेत, असा दावा सामाजीक कार्यकर्त्या अंजली दमानीया यांनी केला आहे.(Bhujbal To Join BJP) त्यांच्या या दाव्याला भुजबळांनी आता प्रत्युत्तर दिलंय. आपल्या पक्षात मला कुठलाही त्रास नाही आणि माझी येथे घुसमटही होत नाही, असं भुजबळांनी म्हटलंय.(Bhujbal On NCP)

माध्यमांशी संवाद साधताना पुढे त्यांनी म्हटलं की, मला अजुन याबाबत काही माहिती मिळालेली नाही. मात्र माझ्या आधी त्यांना ही माहिती कशी काय मिळाली हे मला माहीत नाही. मला कुठल्या पदाची हौस नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मी ओबीसीसाठी काम करत आहे, असं प्रत्युत्तर भुजबळांनी दिलंय.

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली होती. या टीकेवरून देखील भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे.(Bhujbal on Sanjay Gaikwad) “संजय गायकवाड काय म्हणाले ते काल मी पण ऐकलं. मला पण ते एकूण वाईट वाटलं. जी भाषा त्यांनी काल वापरली ते बरोबर नाही. मी पण शिवसेनेत होतो, तुम्ही ज्या शिवसेनेत शिकला त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो, अशा शब्दांत भुजबळांनी गायकवाडांना टोला लगावला आहे.

तो पूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांना

संजय गायकवाड यांनी जे वक्तव्य केलं ते मुख्यमंत्री बघतील. मला मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याचे पूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांचे आहेत. लाथ घालण्याची भाषा त्यांनी केली मात्र ते काही होऊ शकत नाही. कारण मी आनंद दिघे आणि मो.दा.जोशी या शिवसेनेच्या नेत्यांचे नेता म्हणून मी काम केलं आहे, असं भुजबळांनी म्हटलंय.

Latest Posts

Don't Miss