Saturday, January 18, 2025

Latest Posts

कोणाला तिकीट मिळणार यावर चेन्नीथला यांनी स्पष्टचं सांगितले

| TOR News Network |

Congress Vidhansabha Ticket Latest News :  हे खरे आहे की लोकसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला मिळालेले यश बघता आता पक्षात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र आदगामी विधानसभा बघता त्यांच्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ शकतो व ते नाराज होऊ शकतात. व याचाच मोठा फटका काँग्रेसला विधानसभेत बसू शकतो.नेमकी हीच बाब लक्षात घेता महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रभारी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांनी या सर्व प्रश्नांवरील आपले मत स्पष्ट पणे मांडले आहे. (Ramesh Chennithala on Ticket Distrubition)

राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. तरीही विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राजकीय पक्षांचे दौऱे, बैठका, सभा सुरू झाल्या आहेत.(All Party Meeting For Vidhansabhe) इच्छुक उमेदवार पक्षश्रेष्ठींभोवती घिरट्या घालू लागले आहेत. राजकीय पक्ष विधानसभेसाठी आपापली रणनीती ठरवू लागले आहेत. अशातच महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांनी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत मोठे विधान केले आहे.

छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथील नेत्यांच्या उपस्थितीत  बैठकीत त्यांनी तिकीट वाटपावर भाष्य केले आहे. “महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आपला पक्ष मेहनती, निष्ठावंत आणि नवीन चेहऱ्यांना तिकीट देईल, असे सूचक विधान चेन्नीथला यांनी केले आहे.( Ramesh Chennithala on Vidhansabha Election 2024) जनतेने दिलेल्या पाठिंब्यामुळे राज्यात लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला असल्याचे त्यांनी नमुद केले. (Congress Came with Big Party in Loksabha)

सार्वत्रिक निवडणुकीत महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48  पैकी 13 जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या.  यासंदर्भात बोलताना  रमेश चेन्निथला म्हणाले, “2019 मध्ये काँग्रेसकडे राज्यात फक्त एकच खासदार होता. 2024 मध्ये, गलीतील अपक्ष खासदारांसह ही संख्या 14 पर्यंत वाढेल. (Ramesh Chennithala On Loksabha) दल थदको) लोकसभा निवडणुकीत जसं यश मिळालं, त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा आमचा उद्देश आहे. काँग्रेस महाविकास आघाडीसोबत एकत्र निवडणूक लढवणार आहे.(Will Repeat history like Loksabha)

रमेश चेन्निथला म्हणाले, “विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी परिश्रम घेतलेल्या नवीन आणि निष्ठावान चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला जाईल. (First Prefrence to New and honest Congress Worker) निवडणुकीनंतर मुख्यमंत्र्यांचा चेहरा विधिमंडळ पक्षनेते ठरवला जाईल.

ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024 मध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी निवडणुका होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना, यूबीटी, राष्ट्रवादी काँग्रेस, शरतचंद्र आणि महाविकास आघाडीतील इतर पक्षांनी महायुती म्हणजेच भाजप, शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दारूण पराभव केला होता. विधानसभा निवडणुका मित्रपक्षांसोबत लढवण्याच्या रणनीतीवर काँग्रेस काम करत आहे. पक्षाचे नेते याबाबत मित्रपक्षांशी एकमत घडवण्यात व्यस्त आहेत.

Latest Posts

Don't Miss