Sunday, November 17, 2024

Latest Posts

आमदार प्रतिभा धानोरकरांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ

| TOR News Network | Pratibha Dhanorkar Latest News : काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी व चंद्रपूरच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी एक मोठे वक्तव्य करुन एकच खळबळ उडवून दिली. त्या प्रसार माध्यमांशी बोलता असताना त्यांनी थेट आपल्याच पक्षाला घरचा अहेर दिला आहे. त्या म्हणाल्यात  माझ्या पक्षातील काही लोकच माझ्या विरोधात असून त्यांच्या याच विरोधाने माझ्या पतीचा जीव घेतलाय. आता ते माझ्या मागे लागले आहेत असे वक्तव्य प्रतिभा धानोरकर यांनी केले.त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातू मोठी खळबळ उडाली आहे. (Pratibha Dhanorkar On Congress)

माझ्याबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत

विरोधामुळे एक जीव गेला आता दुसरा जीव जाणार नाही, याची काळजी मी घेईन, असंही प्रतिभा धानोरकर यांनी ठणकावून सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.या चर्चांना देखील प्रतिभा धानोरकर यांनी पूर्णविराम दिला आहे. माझ्यावर आरोप करणारे नेते स्वतः भाजपमध्ये जाणार आहेत. मात्र, अफवा माझ्याबद्दल पसरवल्या जात आहेत. मी कुठेही जाणार नसून काँग्रेसच्याच तिकिटावर लोकसभा लढवणार आहे, असं प्रतिभा धानोरकर यांनी स्पष्ट केलं आहे.(I will Contest Loksabha from congress)

माझी तयारी सुरू आहे

खासदार साहेब गेले तेव्हापासून पक्षातील काही लोकच माझा विरोध करीत आहेत. या विरोधामुळेच माझ्या पतीचा त्यांनी जीव घेतलाय. आता ते माझ्या मागे लागले असून एक जीव गेला मात्र मी दुसरा जीव जाऊ देणार नाही, असंही प्रतिभा धानोरकर यांनी म्हटलं आहे.चंद्रपूर येथून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस प्रभारी चेंनिथला यांच्यासोबत मतदारसंघाबाबत चर्चा करण्यात आली, मात्र त्यांनी कुठलंच आश्वासन दिलं नाही. काँग्रेसमध्ये वेळेपर्यंत कुठला निर्णय होत नाही.(No decision is made in Congress till time) मला कुठले निर्देश नसले तरी माझी तयारी सुरू आहे, असंही धानोरकर म्हणाल्या.

शिवानी वडेट्टीवार माझी प्रतिस्पर्धी नाही

मला लोकसभा निवडणूक लढवायची आहे, अशी प्रतिक्रिया देतानाच आमच्या पक्षात भाजपच्या पे-रोलवर चालणारे काही लोकं आहेत, अशी जहरी टीका आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली. तिकीट मागण्याचा प्रत्येकाला अधिकार असून शिवानी वडेट्टीवार काही माझी प्रतिस्पर्धी नाही. कोणी दिल्लीला शिष्टमंडळ नेल्याने तिकीट मिळत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Latest Posts

Don't Miss