Saturday, January 11, 2025

Latest Posts

चंद्रकांत पाटील अडचणीत ; महायुतीला ‘लाडके गुंड‘ महत्वाचे – वडेट्टीवार

| TOR News Network |

Chandrakant Patil Latest News : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता दिसून येत आहे. पाटील यांना माहित असतानाही त्यांनी कुख्यात गुंड गजानन मारणे यांनी दहिहंडीच्या पुण्यातील कार्यक्रमात भेट दिली. मारणेने यावेळी चंद्रकांत दादांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.( Gangster Gajanan Marne felicitated BJP leader Chandrakant Patil ) मंत्री महोदयांनी यावेळी पुष्पगुच्छ स्वीकारला. त्यावरुन आता काँग्रेसने भाजपवर जोरदार हल्ला चढवला. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आता या मुद्दावरुन मंत्रिमहोदयांवर चांगलेच तोंडसूख घेतले.(Vijay Wadettiwar Slams Chandrakant Patil) त्यांनी भाजपला चिमटा काढला.

याप्रकरणात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील आणि गुंड गजानन मारणे यांच्यासंबंधीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.( Vijay Wadettiwar Share Video Of Gangster Marne) त्यात मारणे हा मंत्रिमहोदयांना पुष्पगुच्छ देताना दिसत आहे. एका दहिहंडी कार्यक्रमातील हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ वडेट्टीवार यांनी शेअर केला आहे.

कुख्यात गुंड गजानन मारणे याने मंगळवारी झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार केला. त्याने पुष्पगुच्छ देऊन चंद्रकांत पाटील यांचे स्वागत केले. गजानन मारणे हा पुण्यातील कोथरूड भागात वास्तव्यास आहे. चंद्रकांत पाटील कोथरूडचे आमदार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा कोथरूडमधून निवडणूक लढवण्याची तयारी चंद्रकांत पाटील यांनी सुरू केली आहे. यापूर्वी या गुंडासोबत भाजपचेही कनेक्शन समोर आल्याने विरोधकांना टीका करण्याची संधी मिळाली आहे. (Bjp and Gangster Connection) या प्रकारानंतर काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर हल्ला केला आहे. त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील आणि गुंड गजानन मारणे यांच्या व्हिडिओ एक्सवर शेअर केला. त्यात ‘लाडके गुंड’ असे कॅप्शन दिले आहे.(Ladka Gund tweet by Vijay Wadettiwar) मंत्री महोदयांनी पुष्पगुच्छ स्वीकारून गजानन मारणेला हात जोडले, असा चिमटा काँग्रेसने काढला आहे.

Latest Posts

Don't Miss