Saturday, January 11, 2025

Latest Posts

ही आपली शेवटची निवडणूक – चंद्रकांत खैरे

| TOR News Network | Chandrakant Khaire Latest News : लोकसभा निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीनगरमधून ठाकरे गटाकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना सहाव्यांदा उमेदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चंद्रकांत खैरे भावुक झाल्याचं पहायला मिळालं.(Khaire emotional Statement) शिवसेना पक्षाशी आणि उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिल्यामुळेच आपल्याला उमेदवारी मिळाली असल्याचं चंद्रकांत खैरे म्हणाले. शिवाय आपली ही शेवटची निवडणूक असून आपण जिंकून येणारच, असा विश्वासही चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला आहे.(We will win from sambhajinagar seat)

निवडणुकीत जिंकून येईल असा विश्वास

लोकसभेची उमेदवारी मिळाल्याबद्दल चंद्रकांत खैरे यांनी आनंद व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे यांचे धन्यवाद मानतो आणि येणाऱ्या निवडणुकीत जिंकून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तिकिटासाठी थोडा संघर्ष करावा लागला हे सुद्धा त्यांनी मान्य केलं. त्यामुळे यावेळी ते थोडे भावनिक सुद्धा झाले. मात्र, आता तिकीट मिळाल्यानंतर अंबादास दानवेही विरोधात काम करणार नाही, ही शिवसेनेची पद्धत आहे. तिकीट मिळाल्यावर सगळे जोमाने काम करतात तसे जोमाने काम करू. आम्ही निवडून येऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

काय म्हणाले अंबादास दानवे

मी नाराज नाही. पक्षाचं हित मला कळलं. सर्वांची मते जाणून घेऊन ही यादी करण्यात आली आहे. मी 2014, 2019 मध्ये इच्छुक होतो तशी आताही इच्छा होती. इच्छा असणे चूक नाही. मात्र माझ्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची महत्वाची जबाबदारी दिली आहे, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं.(Ambadas danve) आम्हाला हट्ट करण्याचा अधिकार आहे. निर्णय घेण्याचा अधिकार पक्षप्रमुखांचा आहे. व्यक्तिगत हितापेक्षा संघटनेचे हीत महत्वाचं आहे. पक्षप्रमुख आणि पक्ष जी जबाबदारी देतील ती सर्व जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे, असंही अंबादास दानवे यांनी म्हटलं.

Latest Posts

Don't Miss