Saturday, January 11, 2025

Latest Posts

तुम्ही तुताऱ्या वाजवा… नाहीतर मशाली पेटवा, पण….

Tutari Group Symbol Launched : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नव्या चिन्हाचं आज अनावरण किल्ले रायगडावर झाले. यावेळी रायगडावर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.(NCP New Symbol Launched) या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही टीका केली आहे. तुम्ही तुताऱ्या वाजवा… नाहीतर मशाली पेटवा. पण आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आम्ही 45 पेक्षा जास्त जागा आम्ही निवडणूक आणू, असं म्हणत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार गट आणि ठाकरे गटावर टीका केली आहे.(Chandrakant Patil On Sharad Pawar Uddhav Thackeray Group)

महाराष्ट्रात  45 पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू

तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा. परंतु महाराष्ट्रात 45 आम्ही म्हणत होतो, पण तेही आता आम्ही क्रॉस करू अशी दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता वाढत आहे. (Modis popularity is increasing) मोदींची जात, पात, धर्म, गट यांच्या पुढे गेलेले आहेत. मोदीजींनी लाभार्थी नावाचा गट निर्माण केला आहे. आणि तो असा म्हणतो की, विरोधी पक्षांचे राजकारण आता बास. आम्हाला फक्त मोदीजी पाहिजेत. त्याचा प्रत्यय आता दिसत आहे. दोन महिन्यापूर्वी झालेल्या देशातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुका, तीन राज्यातील निवडणुकीत भाजपला यश मिळाले, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.(BJP got success in the election)

राज्यात महायुती 48 पर्यंत जाईल

मध्यप्रदेशच्या इतिहासात भाजपला एवढी मोठी यश मिळाले होते. हमको लाभ मिला है तुम जो करना है तो करो. पण निवडणुकीत शेवटपर्यंत विरोधी पक्षाने हार मानायची नसते. विरोधी पक्ष किंवा शरद पवारही म्हणतात आमच्या 20-22 जागा येणार आहेत. मात्र राज्यात महायुती 48 पर्यंत जाईल असे वाटतंय, असं चंद्रकात पाटील म्हणाले.

असं आहे शरद पवारांच्या पक्षाचं नवं चिन्ह : उद्या रायगडावर लॉन्चिंग

शेतकरी आंदोलनावर म्हणाले….

दिल्ली शेतकरी आंदोलनावरही चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी समर्थ आहेत. नरेंद्र मोदी हे आपल्या मंत्र्यांच्या मदतीने संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. यातून नक्कीच मार्ग निघेल. कुणी धमकी देण्याचं कारण नाही. मोदींच्या नेतृत्वाखाली जगात भारत स्ट्रॉंग झाला आहे.(Under the leadership of Modi India is Strong In World) त्यामुळे अशा धमक्यांना घाबरायचं कारण नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

Latest Posts

Don't Miss