Saturday, January 18, 2025

Latest Posts

नितीश कुमार, चंद्रबाबूंच्या ‘त्या’ मागणीने मोदींना टेन्शन

| TOR News Network |

Chandrababu Naidu & Nitish Kumar Latest News : लोकसभा निकालात एनडीएने आघाडी घेऊनही भाजपला बहुमताचा आकडा गाठताना मोठी दमछाक झाली. त्यातच आता नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे किगमेकर ठरणार आहेत. (Chandrababu Naidu & Nitish Kumar will be Kingmaker) या दोघांच्या भूमिकेने एनडीएमध्ये दबावतंत्राचा अध्याय सुरु होणार आहे.

लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालाने भाजपला अपेक्षित यशाचा टप्पा गाठता आला नाही. मित्र पक्षांच्या मदतीने भाजपने 300 जागांच्या जवळपास झेप घेतली.(NDA Near ABout 300 Seats) मित्र पक्षांनी पण आता धक्कातंत्राचा वापर सुरु केला आहे. चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे किंगमेकर ठरणार असल्याचे निकालावरुन स्पष्ट होत आहे. त्यात चंद्रबाबू यांनी तर मागण्यांचा खलिता पण तयार केल्याचे सांगण्यात येत आहे. या मागण्यांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे टेन्शन वाढणार असे चित्र आहे.(Modi, Amit Shah In Tension)

चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार एनडीए आघाडीवर दबाव तंत्राचा वापर करत असल्याचे समजते. लोकसभा अध्यक्षपदासाठी दोन्ही पक्ष आग्रही आहेत. (Loksabha President Demand by Both Leaders) चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार दोघेही लोकसभा अध्यक्षपदाची मागणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.पंतप्रधान मोदी आणि भाजप ही मागणी मान्य करणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

चंद्राबाबू नायडू पक्षाच्या आमदारांसोबत बैठक घेणार आहेत. टीडीपी आमदारांशी बैठक केल्यानंतरच चंद्राबाबू नायडू दिल्लीला रवाना होणार आहेत. नायडू टीडीपी आमदारांची मत जाणून घेणार आहेत. चंद्राबाबू नायडू यांचा कल इंडिया आघाडीकडे की NDA कडे आज संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल. (Chandrababu naidu Will Take Dicussion in evening)

चंद्राबाबू नायडू यांना अखिलेश यादव भेटणार आहेत.आज दोन्ही नेत्यांची दिल्लीत भेट होणार असल्याची माहिती समोर येत आहे. (Akhilesh Yadav to meet chandrababu naidu)इंडिया आघाडीकडून नायडू यांच्याशी संपर्क साधण्याची जबाबदारी अखिलेश यादव यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तेलंगणा मुख्यमंत्री रेवंत रेड्डीही चंद्रबाबू नायडू यांच्याशी संपर्क साधू शकतात. इंडिया आघाडीतील नेत्यांनी रेवंत रेड्डी यांना भेट घेण्याची जबाबदारी दिली आहे.(Revant Reddy to contact chandrababu naidu) इंडिया आघाडीत कदाचित चांगल्या पदाची, मंत्रालयाची ऑफर त्यांना देण्यात येऊ शकते.

नितीश कुमार आणि तेजस्वी यादव एकाच विमानाने दिल्लीला रवाना झाले.(Nitesh kumar tejasvi yadav in one flight) राजधानी दिल्लीत इंडिया आघाडीची एनडीएची बैठक होत आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी तेजस्वी यादव तर एनडीएच्या बैठकीसाठी नितीश कुमार दिल्लीसाठी एकाच विमानाने रवाना झाले. दोघांच्या एकत्रित प्रवासाने चर्चेला उधाण आले आहे.

Latest Posts

Don't Miss