Saturday, January 11, 2025

Latest Posts

ॲनिमलवर सेन्सॉर बोर्डाची कात्री

Animal Movie Latest News : सध्या सर्वात चर्चेत असलेला ॲनिमल चित्रपट 1 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र हा चित्रपट आता सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत सापडला आहे.(Censor Board Cuts Some Scenes from Ranbir Kapoor Up coming Movie Animal) या सिनेमातील काही दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने आपला आक्षेप नोंदवला आहे.

साऊथचा प्रसिद्ध दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डीच्या ॲनिमलची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे.पुढील दोन दिवसांनी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी त्याच्या व्हायरल टीझर अन् ट्रेलरला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता सेन्सॉर बोर्डानं या चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेतल्याचे बोलले जात आहे. चित्रपटातील काही प्रसंग, किसींग सीन आणि व्हायलन्स यामुळे बोर्डानं कडक धोरण अवलंबले आहे. ॲनिमलमधून रणबीर कपूर आणि रश्मिका हे पहिल्यांदाच स्क्रिन शेयर करत आहेत. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतो आहे. त्यांच्या किसिंग सीनची जोरदार चर्चा रंगली असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करेल असे सांगण्यात येत आहे. या सगळ्यात सेन्सॉर बोर्डाची ॲनिमलवर नाराजीही दिसून आली आहे.

Latest Posts

Don't Miss