Saturday, January 18, 2025

Latest Posts

सीबीएसईत पुन्हा मुलींनी मारली बाजी

Theonlinereporter.com – May 13, 2024 

CBSE 12th Board Result Latest News : सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे. ( CBSE 12th Result declared )सीबीएसई बोर्डाने इंटरच्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केले आहेत. (12th CBSE Result Out) सीबीएसई बोर्डाकडून या वर्षी बारावीच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. 87.98% विद्यार्थी यंदा उत्तीर्ण झाले आहेत. (87.98% student pass in cbse)

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीबीएसई)च्या इयत्ता 12वीचा निकाल 13 मे रोजी जाहीर झाला. या परीक्षेत यंदा 87.98 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. (Girls On top At 12th CBSE)जर तु्म्हाला निकाल चेक करायचा असेल तर cbse.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तेथे तुमचा रोल नंबर टाकून रिझल्ट पाहू शकता. इयत्ता बारावीचा निकाल लागल्याने आणि घवघवीत यश मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.यावर्षी मुलांच्या तुलनेत जास्त मुली पास झाल्या आहेत. मुलींची टक्केवारी 91 टक्के आहे जी मुलांच्या तुलनेत 6.40 टक्के जास्त आहे.

सीबीएसई बोर्ड रिझल्ट 2024

उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थींनीची टक्केवारी – 91.52 %

उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी – 85.12 %

उत्तीर्ण झालेल्या ट्रान्सजेंडरची टक्केवारी – 50.00 %

निकालाची टक्केवारी

त्रिवेंद्रम- 99.91%, विजयवाडा- 99.04%, चेन्नई – 98.47%, बेंगलुरु- 96.95%, दिल्ली वेस्ट- 94.64%, दिल्ली ईस्ट- 94.51%, चंडीगड- 91.09%, पंचकुला- 90.26%, पुणे- 89.78%, अजमेर- 89.53%, डेहरादून- 83.82%, पटना- 83.59%, भुवनेश्वर- 83.34%, भोपाळ- 82.46%, गुवाहाटी- 82.05%, नोएडा- 80.27%, प्रयागराज- 78.25%

Latest Posts

Don't Miss