Saturday, January 18, 2025

Latest Posts

माझ्या घरात कुर्ते आणि पायजम्याशिवाय काहीही मिळणार नाही

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरावर सीबीआयने छापे

Satya Pal Malik Latest News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उघड पणे बोलणारे व त्यांचा विराध करणारे जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक अडचणीत सापडले आहेत. मलिक हे रुग्णालयात दाखल असतानाच सीबीआयने त्यांच्या ३० ठिकाणांवर छापे टाकले आहेत. (Satyapal Malik CBI Raid ) या छाप्यांमुळे मी घाबरणार नाही असे सांगत मलिक यांनी ट्विट केले. (CBI Raid On Former Governor of Jammu and Kashmir Satya Pal Malik)

मलिक म्हणालेत मी गेल्या ३-४ दिवसांपासून आजारी असून रुग्णालयात दाखल आहे. (Satyapan Malik Admitted in Hospital)असे असतानाही माझ्या घरावर छापे टाकले जात आहेत. माझ्याकडे ( घरात) 4-5 कुर्ते आणि पायजम्याशिवाय काहीही मिळणार नाही, असे सांगत त्यांनी या छाप्यांमुळे आपण घाबरणार नसल्याचे स्पष्ट केले. (Their Will Be nothing Getting in CBI Raid)किरू हायड्रो प्रोजेक्टशी प्रकरणी मलिक यांच्या निवासस्थानी छापा टाकण्यात आला. यापूर्वी सीबीआयने विमा घोटाळ्याप्रकरणी मलिक यांच्यावर कारवाई केली होती. याआधीही सीबीआयने जम्मू-काश्मीरमधील सत्यपाल मलिक आणि त्याच्या निकटवर्तीयांच्या घरावर छापे टाकले होते.

हे छापे टाकून माझा ड्रायव्हर आणि माझ्या सहाय्यकालाही नाहक त्रास दिला जात आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी या छाप्यांना घाबरणार नाही. मी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असे मलिक म्हणाले. सीबीआयच्या पथकाने मलिक यांच्या घरासह अन्य 30 ठिकाणी देखील छापे मारत कारवाई केली.

जे भ्रष्टाचारात सहभागी आहेत, अशी ज्यांच्याबद्दल मी तक्रार केली होती त्यांची चौकशी करण्याऐवजी माझ्या निवासस्थानावर सीबीआयने छापे टाकले. माझ्याकडे 4-5 कुर्ते आणि पायजमे यांच्याशिवाय काहीही सापडणार नाही. सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून हुकूमशहा मला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी घाबरणार नाही आणि झुकणार नाही, असं त्यांनी ट्विटमध्ये नमूद केलं.

300 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, किश्तवाडमधील किरू जलविद्युत प्रकल्पासाठी 2,200 कोटी रुपयांचे नागरी कामाचे कंत्राट देण्यात कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात 2019 मध्ये हा छापा टाकण्यात आला होता. 23 ऑगस्ट 2018 ते 30 ऑक्टोबर 2019 या कालावधीत जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल असलेले मलिक यांनी या प्रकल्पाशी संबंधित दोन फाईल्स मिटवण्यासाठी 300 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप केला होता.

सीबीआयने केला गुन्हा दाखल

मलिक यांनी लावलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांसंदर्भात सीबीआयने एक एफआयआर दाखल केली होती. चिनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्ट्स पॉवर लिमिटेडचे ​​माजी अध्यक्ष नवीन कुमार चौधरी आणि इतर माजी अधिकारी एमएस बाबू, एमके मित्तल आणि अरुण कुमार मिश्रा आणि पटेल यांच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला होता.

Latest Posts

Don't Miss