| TOR News Network | BS Yediyurappa Latest News :भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी केलेल्या एक गल्लीछ कृत्यामुळे त्यांच्वर पोलिसांनी गुन्हा देखल केला आहे.येडियुरप्पा यांच्यावर एका अल्पवयीन मुलीचा कथित लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. (Sexual offences against Yediyurappa)याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोक्सो आणि ३५४ (ए) आयपीसी कलमांर्तग गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(In the case of Sexual assault Case on Yediyurappa)
एफआयआरमधील माहितीनुसार, एका १७ वर्षीय मुलीच्या आईने 2 फेब्रुवारी याबाबत तक्रार दाखला केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (A case has been registered under the POCSO Act) या प्रकरणी येडियुरप्पा यांनी अद्याप आपली भूमिका मांडलेली नाही.
वेगवेगळ्या प्रकरणात तक्रार दाखल
पीडित मुलगी आणि तिची आई एका फसवणूक प्रकरणात येडियुरप्पा यांच्याकडे मदत मागण्यासाठी आले होते. त्यावेळी ही घटना घडल्याची माहिती एफआयआरमध्ये आहे. (Fir Against Former Cm BS Yediyurappa) येडियुरप्पा यांच्या कार्यालयाकडून याबाबत निवेदन जारी करण्यात आलं आहे. येडियुरप्पा यांच्या कार्यालयाने जवळपास ५३ प्रकणांची यादी जारी केली आहे. ज्यामध्ये संबंधित महिलेने वेगवेगळ्या प्रकरणात अशाच प्रकारे तक्रार दाखल केल्याचे सांगण्यात आले आहे.
दोन वेळा राहिले मुख्यमंत्री
बीएस येडियुरप्पा २००८ आणि २०११ मध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यानंतर मे २०१८ मध्ये आणि पुन्हा जुलै २०१९ ते २०२१ पर्यंत ते कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले आहेत. (BS Yediyurappa 2 Times Cm Of Karnataka) २०२१ त्यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.मुख्यमंत्रीपदाची आपला निर्णय जाहीर करताना येडियुरप्पा मंचावर रडले होते.